*पाच अतिरिक्त शहरांत विस्तारासाठी $५० मिलियन डॉलर्सची तरतूद*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
गेल्या दशकभरात, किडझानिया इंडियाने आपल्या “एड्युटेनमेंट” संकल्पनेसह, शिक्षण आणि करमणुकीचे संयोजन, मुलांना सर्जनशीलता, शिक्षण आणि मौजमजेसाठी प्रेरणा देणाऱ्या विविध व्यवसायांत प्रयोग करण्यास सक्षमतेचे काम सुरू ठेवले आहे. हा उल्लेखनीय मापदंड चिन्हांकित करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
किडझानियाचे अध्यक्ष आणि सीईओ झेव्हिअर लोपेझ अॅनकोना म्हणाले, “जगभरातील मुलांचे निरीक्षण करून, त्यांची वर्तणूक आणि खेळातील समानता पाहून मी आश्चर्यचकित झालो. अतुलनीय कुतूहल आणि प्रात्यक्षिक, प्रायोगिक शिक्षणाबद्दल प्रेमावर किडझानियाची दूरदृष्टी आधारलेली आहे. जिथे शिक्षण अखंडपणे मनोरंजनासोबत एकजीव होते, एक सुसंवाद निर्माण होणार्या क्षेत्राची मी कल्पना केली. शिकणे आनंददायक असले पाहिजे; जिथे तरुण मनं जीवनासारख्या परिस्थितींमध्ये गुंततात, निवड करतात आणि एकसंधतेचे मूल्य समजून घेतात. आम्ही भारतात किडझानियाची १० वर्षे साजरी करत असताना, आमचे ध्येय स्थिर राखून आहोत: भविष्यातील नेतृत्वांचा शोध प्रज्वलित करणारे व्यासपीठ सुसज्ज करणे, सर्जनशीलता वृद्धिंगत करणे आणि शोधाचा आनंद घेणे. या संवर्धनाच्या जागेत, आम्ही भविष्यातील पिढीला सक्षम बनवतो आणि म्हणूनच किडझानिया इंडिया, प्रख्यात पुरस्कार-विजेते ग्लोबल इनडोअर थीम पार्क, तरुण अभ्यागत आणि कुटुंबांना नाविन्यपूर्ण शिक्षण अनुभव प्रदान करण्याच्या १० वर्षांच्या वर्धापनदिनाची अभिमानाने घोषणा करते.”
किडझानियाच्या भारतातील प्रवासाविषयी आपले विचार मांडताना, किडझानिया इंडियाचे संस्थापक आणि प्रवर्तक पारस चंदरिया म्हणाले, “किडझानियामधील आमची गुंतवणूक निवड आर्थिक गरजेच्या पलीकडे आहे; शिक्षण, मनोरंजन आणि पुढच्या पिढीसाठी ही गुंतवणूक आहे. झपाट्याने विकसीत होत असलेल्या जगात, आगामी काळातील आव्हानांसाठी तयार करताना तरुण मनांना गुंतवून ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती अत्यंत आवश्यक आहेत. किडझानिया इमर्सिव्ह एक्सपेरिअन्शिअल लर्निंग ही गरज योग्यरित्या पूर्ण करते. यामुळे केवळ मनोरंजनच होत नाही तर निर्णय घेणे, सहयोग आणि समस्या सोडवणे यासारखी आवश्यक जीवन कौशल्ये उपलब्ध होतात. ही गुंतवणूक उज्ज्वल आणि अधिक सक्षम भविष्यासाठी तरुण मनांचे संगोपन करण्याचा विश्वास आहे. तसेच आम्ही या परिवर्तनीय प्रवासात योगदान देण्यासाठी उत्सुक आहोत.”
या प्रवासादरम्यान किडझानिया इंडियाने बळकट ब्रँड भागीदारी राखली असून जी एकात्मिक यशात आपले योगदान देते. पार्लेसारख्या ब्रँडनी सुरुवात करून प्रदीर्घ काळासाठी किडझानिया इंडियासह पार्कच्या यशाचा अविभाज्य भाग राहिला आहे. किडझानिया इंडियाने टीव्हीएस आणि महिंद्रा लाईव्हस्पेससारख्या उद्योगातील मातब्बरांसह नवीन ब्रँड भागीदारीचे स्वागत केले असून अभ्यागतांची अनुभव श्रेणी वृद्धिंगत होत आहे. किडझानिया सध्या २४ उद्देश भागीदारांसोबत कार्यरत आहे आणि प्रत्येक भागीदार मुलांना शोध घेता येईल अशा वैविध्यपूर्ण आणि गुंतवून ठेवणाऱ्या क्रियाकलापात योगदान देत आहे.
“आम्ही साथीच्या रोगानंतर हळूहळू पूर्वपदावर येत आहोत. आमच्या दोन्ही केंद्रांना भेट देणाऱ्यांची संख्या आणि प्रतिसाद लक्षणीय स्तर गाठत आहे. गेल्या १० वर्षांत इथे भेट देणाऱ्यांची संख्या सध्या ७.२ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. पुढील दोन वर्षांत, आम्ही बेंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे या पाच अतिरिक्त बाजारपेठांमध्ये विस्ताराचा विचार करणार आहोत. आम्ही अंतिमतः निश्चित केलेल्या स्थानांवर अवलंबून फॉरमॅट बदलू शकतो, जिथे आमची लहान केंद्रे असू शकतात. पुढील ८-१० वर्षांत, भारत हा जगभरातील किडझानियासाठी सर्वात मोठी बाजारपेठ बनेल. किमान ७-८ केंद्रे चार केंद्रांसह मेक्सिकोला मागे टाकतील. त्याचप्रमाणे, टियर २ मार्केट आणि मुलांचे प्रमाण अधिक असलेल्या आगामी शहरांचा वेध घेण्यात येईल”, असे चंदारिया पुढे म्हणाले.
वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्या माध्यमातून किडझानिया भारताच्या प्रवासाचे सार टिपेल. या दिवसाची सुरुवात हृदयस्पर्शी स्वागतगीत सादरीकरणाने झाली, ज्यामध्ये ऊर्जा आणि उत्साहाचा संगम दिसला. या सादरीकरणातून उद्यानाची भावना अनेक वर्षांपासून परिभाषित करण्यात आली. यावेळी विशेष सत्कार समारंभाचाही समावेश होता. ज्यामध्ये जुने कर्मचारी, मीडिया भागीदार आणि किडझानिया इंडियाच्या वाढीचा अविभाज्य घटक असलेल्या प्रवर्तकांना त्यांच्या चिरस्थायी योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. या सादरीकरणाचा उद्देश किडझानिया इंडियाच्या यशोगाथेला आकार देणार्या सहयोगी प्रयत्नांना ओळखणे आणि साजरे करण्याचा आहे.
किडझानिया इंडियाने तरूण मनांचा शोध, अभ्यास आणि मोठ्या स्वप्नांच्या सकारात्मक आणि प्रोत्साहनपर १० वर्षीय प्रदीर्घ वाटचाल साजरी केली. हा उत्सवी मापदंड सर्जनशील विचारवंत, समस्यांचे निराकरण करणारे आणि भविष्यातील नेतृत्वाच्या आगामी पिढ्यांचे संवर्धन करणारी उद्यानांची वचनबद्धता प्रतिबिंबित करणारा ठरला.
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*