You are currently viewing दिवसभर आंदोलन केल्यावरही पुंडलिक दळवींचे केले नगराध्यक्षांनी अभिनंदन…

दिवसभर आंदोलन केल्यावरही पुंडलिक दळवींचे केले नगराध्यक्षांनी अभिनंदन…

सावंतवाडीत स्टॉल हटाव मोहिमेमुळे तणावाचे वातावरण होते. राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अनारोजीन लोबो यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत दिवाळीच्या कालावधीत लागलेला आकाशकंदील व इतर सामानाच्या तात्पुरती परवानगी घेऊन लागलेला स्टॉल नगरपलिकेतील अधिकाऱ्यांनी हटवला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याविरोधात नगरपालिकेसमोर आंदोलन छेडत स्टॉल पुन्हा उभारला.
हे आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रवादीचे जिल्हा व्यापारी सेल अध्यक्ष पुंडलिक दळवी यांची राष्ट्रवादीच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर झाली. पुंडलिक दळवी, नगराध्यक्ष संजू परब, व अजय गोंदावळे हे व्यावसायिक मित्र आहेत हे सर्वज्ञात आहेच. त्यामुळे पक्षीय आंदोलनात विरोधी दिसले तरी आतून मात्र ते सर्व एकत्रच असतात. मध्यंतरी नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी जास्त जवळीक झाल्याने पक्षीय विरोध असूनही भाजपावासी झालेले अजय गोंदावळे यांच्यावर सावंतवाडी शहर भाजप मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली तर पुंडलिक दळवी हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आले.
काल सकाळपासून स्टॉल हटाव विरुद्ध मोहिमेचे नेतृत्व करून देखील संध्याकाळी आपला व्यावसायिक मित्र पुंडलिक दळवी यांची राष्ट्वादीच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यानंतर पक्षीय मतभेद बाजूला ठेवत नगराध्यक्ष संजू परब यांनी रात्री नऊ वाजता फोन करून “उत्तरोत्तर प्रगती होऊ दे मित्रा” अशा शब्दात अभिनंदन केलं. त्यांच्याच सोबत असलेले अजय गोंदावळे यांनी देखील आपला मित्र पुंडलिक दळवी यांचे अभिनंदन केले. आपल्या मित्रांकडून झालेल्या अभिनंदनाच्या वर्षावाने पुंडलिक दळवी देखील भारावून गेले, आणि आपल्या व्यावसायिक मित्रांनी अभिनंदन केल्याचे संवाद मिडियाकडे आवर्जून सांगितले.
राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी जनतेच्या हितासाठी आपापल्या परीने प्रत्येक पक्ष राजकारण करत असतो, परंतु राजकारणात विरोधात लढले किंवा आंदोलने केली तरी राजकारणाबाहेर आपली मैत्री जपणे हे सुद्धा नक्कीच स्पृहणीय….! परंतु सर्वसामान्य माणसांच्या नजरेत मात्र काहीवेळा ते खटकतं आणि त्यातूनच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ….. राजकारणी लोकांमध्ये असणारी ही मैत्री आणि काहीवेळा करत असलेला विरोध हे केवळ राजकारण आहे की जनतेच्या डोळ्यासमोर जनतेच्या डोळ्यात धूळफेक?

प्रतिक्रिया व्यक्त करा