You are currently viewing बांदा रोटरॅक्ट क्लबतर्फे रोणापाल छात्रालयास जीवनावश्यक वस्तू प्रदान

बांदा रोटरॅक्ट क्लबतर्फे रोणापाल छात्रालयास जीवनावश्यक वस्तू प्रदान

बांदा रोटरॅक्ट क्लबतर्फे रोणापाल छात्रालयास जीवनावश्यक वस्तू प्रदान

बांदा

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांनी रोटरी वर्ष २०२३-२४ साठी सुरू केलेल्या प्रोजेक्ट आशय अंतर्गत आज रपाल छात्रालयास भेट दिली. यावेळी जीवनावश्यक वस्तू व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. मुलांना भेटवस्तू म्हणुन शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, सेक्रेटरी अवधूत चिंदरकर, मिताली सावंत, रोहन कुबडे, दत्तराज चिंदरकर, विनिता कुबडे, शिवम गावडे व रोटरी क्लब ऑफ़ बांदा चे सचिव बाबा काणेकर, पत्रकार मंगल कामत उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी प्रोजेक्ट आशय हा रोटरॅक्ट तर्फे गरजु व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू केलेला अाहे. या अंतर्गत वर्षभर प्रत्येक महिन्यात सिंधुदुर्गातील विविध आश्रमाला भेट देऊन मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी छात्रालयाचे व्यवस्थापक जीवबा वीर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + twenty =