*बांदा पतंजली योग समितीच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात*
*बांदा*
बांदा येथील पतंजली योग समितीच्या वतीने रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पतंजली योग समितीच्या वतीने येथील आनंदी मंगल कार्यालयात नियमितपणे सकाळी ५.३०ते७.००या वेळेत योगवर्ग चालू असतात.या पतंजली योग वर्गात भारतीय सण समारंभ साजरे करण्यात येतात. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने योगवर्ग महिला साधकांनी पुरूषांना राख्या बांधून औक्षण केले व सर्वांना मिठाईचे वाटप केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर व बांदा पतंजली योग समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.