You are currently viewing व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळची चैतन्या चंद्रकांत सावंत   मुंबई विद्यापीठ आयोजित वकृत्व स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी

व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळची चैतन्या चंद्रकांत सावंत   मुंबई विद्यापीठ आयोजित वकृत्व स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी

व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळची चैतन्या चंद्रकांत सावंत   मुंबई विद्यापीठ आयोजित वकृत्व स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी

कुडाळ

मुंबई विद्यापीठात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत व्हिक्टर डाॕन्टस लॉ कॉलेज,कुडाळची विद्यार्थिनी चैतन्या चंद्रकांत सावंत हिने मुंबई विद्यापीठात आयोजित विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मुंबई विद्यापीठाचा ५६ वा आंतर महाविद्यालयिन युथ फेस्टिवल २०२३ वैभववाडी कॉलेजमध्ये संपन्न झाला होता. त्या स्पर्धेतून युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी चैतन्या हिची निवड झाली होती. तिने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक प्राप्त केले. विविध स्पर्धा प्रकारांपैकी वक्तृत्व स्पर्धेत जी २० या जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दिलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम ‘या थीमवर आपले विचार व्यक्त करत तिने स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले.
आत्तापर्यंत चैतन्या हिने अनेक संस्था,मंडळे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचा मान मिळवला आहे. औरंगाबाद येथे काही वर्षांपूर्वी झालेल्या पाणीपुरवठा विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने “स्वच्छता “या विषयावर बोलतानाही तिने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचे पदक मिळविले होते. यापूर्वी अखिल भारतीय हिंदी विद्यापीठाची वक्तृत्व स्पर्धा दिल्ली येथे संपन्न झाली होती. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व तिने केले होते. या स्पर्धेत सर्व विद्यापीठांचा सहभाग होता त्यात अनेक स्पर्धक हिंदी भाषिकच होते. तरीही तेथे मराठी भाषिक विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवून मुंबई विद्यापीठाला भारतात प्रथम येण्याचा मान मिळवून दिला होता. चैतन्या आपल्या अमुक वक्तृत्वाने नाट्य, एकांकिका, कथाकथन व वकृत्व स्पर्धा अशा अनेक स्पर्धेत नेहमीच यश संपादन करत असते.
युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे येथील महाविद्यालयातील एकूण ४४ स्पर्धक सहभागी झाले होते. चैतन्याच्या यशाने चैतन्याने महाविद्यालयासाठी प्रथमच सुवर्णपदक आणले असून ही बाब सिंधुदुर्ग वासियांसाठी अभिमानाची आहे. व्हिक्टर डोंटन्स लॉ कॉलेज कुडाळचे अध्यक्ष श्री डाॕन्टस, प्राचार्या श्रीमती मर्गज सांस्कृतिक विभाग प्रमुख अॕड. संग्राम गावडे सर तसेच पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील मान्यवरांकडून तिचे कौतूक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा