चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळला कोब्रा
मालवण
चौके प्राथमिक आरोग्य केद्रांत रविवारी रात्री ड्यूटी वर असलेले परिचर श्री. संतोष चव्हाण यांना रात्री ८ वाजता साफसफाई करत असताना चौके प्रा आ केंद्रातील कॉरिडॉर मध्ये साप दिसला.त्यांनी बाजूच्या इमारतीत असलेल्या डाँ.प्रवण पोळ व इतर कर्मचारी यांना याबाबत कल्पना दिली. इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा या प्रजातीचा हा साप असल्याचे समजताच वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणव पोळ यांनी तात्काळ मालवण – वायरी येथील सर्पमित्र श्री. अनंत बांबर्डेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सर्पमित्र श्री.अनंत बांबर्डेकर यांनी तातडीने चौके आरोग्य केद्रांत येत हाँलमधील लादीत लपून राहिलेल्या इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्राला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.