बांदा येथे व्ही. एन. नाबर यांची जयंती साजरी
बांदा
मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई च्या बांदा येथील नाबर स्कूल मध्ये व्ही एन नाबर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई यांच्या हस्ते व्ही. एन. नाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सौ मनाली देसाई यांनी नाबर यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की गुरूवर्य नाबर सर शिस्तीच्या बाबतीत खूप कडक होते. त्यांचे विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्याशी खूप स्नेहपूर्ण संबंध होते. तसेच व्ही एन नाबर सरांच्या स्मरणार्थ सध्याची नाबर स्कूल अस्तित्वात येण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतले. प्रशालेसाठी त्यांनी दारोदारी जाऊन निधी गोळा केला होता. इंग्लिश विषय शिकवायचे. तसेच प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीमती रसिका वाटवे, सौ स्नेहा नाईक यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिस्त व संस्कार हा नाबर सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वपूर्ण भाग होता.
यावेळी प्रशालेच्या सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.