मालवण
नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून मालवण बंदर जेटी येथे बुधवार ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्हास्तरीय महिला व पुरुष संघांची कबड्डी स्पर्धा लायन्स क्लब मालवण, मालवण व्यापारी संघ व एकता मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
पुरुष गटात एकूण बारा संघ सहभागी होणार असून चार स्थानिक व आठ निमंत्रित संघांचा समावेश असणार आहे. विजेत्या संघास ११,१११ व चषक (उमेश नेरुरकर पुरस्कृत), उपविजेता ६,६६६ व चषक (मुकेश बावकर पुरस्कृत) तसेच तृतीय व चतुर्थ संघास प्रत्येकी दीड हजार व चषक महेश गिरकर यांच्या स्मरणार्थ.
महिला गटात आठ संघ सहभागी होणार असून तीन स्थानिक व पाच निमंत्रित संघांचा यात समावेश असणार आहे. महिला गटातील विजेत्या संघास ३,३३३ व चषक(वैशाली शंकरदास पुरस्कृत), उपविजेत्या संघास २,२२२ व चषक (विश्वास गांवकर पुरस्कृत) यासह दोन्ही गटात उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट खेळाडू यांना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तीन मैदानावर स्पर्धेचे एकूण अकरा सामने होणार आहेत. अशी माहिती लायन्स क्लब अध्यक्ष विश्वास गावकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर यांच्या वतीने देण्यात आली आहे.