You are currently viewing भात उत्पादक शेतक-यांना ठाकरे सरकार कडून मिळणार प्रति क्विंटल ₹700.00 प्रोत्साहन

भात उत्पादक शेतक-यांना ठाकरे सरकार कडून मिळणार प्रति क्विंटल ₹700.00 प्रोत्साहन

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भात उत्पादक शेतक-यांना हमी भावाच्या व्यतिरिक्त प्रति क्विंटल ₹700 एवढे प्रोत्साहन जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. म्हणजेच भात उत्पादक शेतक-यांना आता प्रति क्विंटल एकूण ₹2568 एवढी रक्कम मिळणार आहे.  त्यामुळे शेतक-यांनी आता आपले भात पीक खासगी व्यापाऱ्यांना न विकता ते सरकारी भात खरेदी केंद्रावरच द्यावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांच्याकडून करण्यात आले आहे.
तसेच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 100 विदयार्थी प्रवेश क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते 500 खाटांचे करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे राज्यात कार्यरत असलेले ठाकरे सरकार हे कोकणाला सातत्याने झुकते माप देत आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा