You are currently viewing सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन अंथुर्णे (ता.इंदापुर जि.पुणे )येथे संपन्न

सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन अंथुर्णे (ता.इंदापुर जि.पुणे )येथे संपन्न

सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन अंथुर्णे (ता.इंदापुर जि.पुणे )येथे संपन्न

पुणे-(प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)
अतिथी मंगल कार्यालय , अंथुर्णे (ता.इंदापूर) येथे
ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरूवातग्रंथ दिंडी ने झाली.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखीचे पूजन संमेलनाध्यक्ष लोककवी सीताराम नरके यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले .सोबत संमेलनकार्याध्यक्ष रानकवी जगदीप वनशिव, प्रमुख पाहुण्या कवयित्री दीपिका कटरे (वृत्त निवेदिका), जयश्री सोनवणे, पत्रकार भारत कवितके , डॉ मदन देगावकर, मधुकर गिलबिले ,विजय कुमार पांचाळ सुनिता कपाळे हे हजर होते.
टाळ मृदंग तालावर वाजत गाजत अभंग म्हणत सर्वच रसिक, साहित्यिक, पत्रकार ,गावकरी ग्रंथ दिंडीत रममाण झाले .अंथुर्णे गावाला प्रदक्षिणा घालून संमेलन स्थळी पालखीचे आगमन झाले.
सर्व मान्यवरांचे ,प्रमुख पाहुण्यांचे विचारमंचावर विराजमान होताच स्वागत गीत गाऊन कवयित्री सुनिता कपाळे यांनी स्वागत केले.
उद्घाटक आमदार दत्ता भरणे मामा, संमेलन अध्यक्ष लोककवी सीताराम नरके, संमेलनाध्यक्ष रानकवी जगदीप वनशिव व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
सुरवातीला बालकलाकार निखिल सोनवणे, सिध्दी जाधव यांनी देशभक्ती पर गीतावर नृत्य सादर केले.
प्रा नारायण गडाख सरांनी गुरू महिमा हे गीत सादर करून रसिकांची मने जिंकली.
उद्घाटक आमदार दत्ता भरणे मामा यांनी सर्व साहित्यिकांचे आभार मानले. चांदा ते बांदा पासून साहित्यिक आले त्याबद्दल आमच्या गावांचे भाग्य उजळून आले .साहित्य वारसा जपण्याचे अवघड असते. येथून पुढे हा वारसा नक्कीच चालू ठेवू या . साहित्य संमेलनासाठी वैयक्तिक एक लाख रुपये दरवर्षी देईन असे त्यांनी जाहीर केले.
“कविसंमेलन कवितेच्या रानात” या प्रथम सत्रातील कविसंमेलन अध्यक्ष माणदेशी कवी डॉ लक्ष्मण हेंबाडे, प्रमुख पाहुणे कवी अरुण कांबळे, श्रीमंत आकळे (पोलिस सहाय्यक आयुक्त परिवहन विभाग पुणे ),लक्ष्मण शिंदे, शशीकांत गरूड ,डॉ मदन देगावकर हे हजर होते
महाराष्ट्रातील अनेक कवी कवियत्री डॉ सुशिल सातपुते विजयकुमार पांचाळ दीपक नागरे सुनिता कपाळे अनिल केंगार गौसपाक मुलाणी संतोष रायबान अमीर पटेल धम्मयान कांबळे मल्हारी गायकवाड रामप्रभू माने अजित माने संगिता माने मयुरेश कुलकर्णी शुभागी बाबर गौतम वाघमारे सुवर्णा पवार आम्रपाली धेंडे योगिता कोठेकर ऋषिकेश पाटील विद्या खामकर सुनिता शटगार
जयश्री सोनवणे जनाबापू पुणेकर छगन वाघचौरे देवेंद्र गावंडे डॉ प्रा प्रतिभा पैलवान प्रा नौबत कोलप साताप्पा सुतार आनंदा भारमल जयश्री माजगावकर दीपिका कटरे
दुसरे कविसंमेलन
“श्रावणधारा “या सत्रात अध्यक्ष कविवर्य व्याख्याते सुभाष सोनवणे (पोलीस अधिकारी), प्रमुख पाहुणे अशोक उन्हाळे, प्रा सुर्यकांत नामगुडे ,विनोद अष्टुळ देवेंद्र गावंडे, होते.
कविसंमेलनात शुभांगी गायकवाड पुजा माळी सोनाली ढमाळ सुमित पवार नवनाथ सोनवणे कृष्णा जाधव अशोक भालेराव,प्रा प्रतिमा काळे ऊर्मिला झगडे रूपाली जाधव दत्तात्रय भोसले दत्तात्रय पवार हरिप्रसाद देवकर पोपट वाबळे आनंद गायकवाड चंद्रकांत जोगदंड सरोज रामचंद्र गुरव कुलकर्णी डॉ मधुकर हुजरे या कवी कवियत्रिंनी आपल्या रचना सादर करून हळव्या तरलता मृदूल विरह प्रेम निसर्ग शेतीमाती विद्रोही राजकारण भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आपल्या शब्दांचा आरसा परखडपणे उलगडून सांगितला.
या सर्व कविसंमेलनाचे समर्थ सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा