You are currently viewing बैठकीचे लोकेशन वार्ताहरांना कोणी दिले..?

बैठकीचे लोकेशन वार्ताहरांना कोणी दिले..?

*संवादच्या बातमीनंतर बांदीवडे येथील बैठक खाकी वर्दीने केली बंद*

 

मालवण तालुक्यातील आचरा बांदिवडे पुलाच्या पलीकडे नदीच्या किनारी सुरू असलेली “सयेकर” नामक व्यक्तीची जुगाराची बैठक संवाद मीडियाच्या बातमीनंतर देसाई नामक खाकी वर्दीने बंद केली. त्यामुळे जुगाराची बैठक बांदिवडे पुलाच्या पलीकडे नदी किनारी बसते ही बातमी वार्ताहरांना कोणी सांगितली याची चौकशी सुरू आहे.

मालवण आचरा बांदिवडे येथील नदी किनाऱ्यावर बसलेली बैठक खाकी वर्दीने बंद केल्याने नव्याने बैठकीसाठी जागेचा शोध सुरू असून जागा बदलून बैठक सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सोशल मीडियावर बातम्या आल्या की जागृत होणारी खाकी वर्दी कर्तव्य म्हणून कधी काम करणार आहे..? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना भेडसावत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अशा गैर धंद्याची दखल घेणार की नाहीत..? असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा