वेंगुर्ले
वेंगुर्लेतील दाभोलीनाका येथील सुमारे २०० वर्षांपूर्वीच्या इमॅक्युलेट कन्फेक्शन चर्चच्या स्मशानभुमी सुशोभिकरणासाठी स्थानिक आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ३० लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे. या मंजुर निधी संदर्भातील पत्र वेंगुर्ला नगरपरिषदेस प्राप्त झाले आहे. अशी माहिती शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वेंगुर्लेतील इमॅक्युलेट कन्फेक्शन चर्चचे फादर फ्रान्सीस डिसोझा व माजी उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडीस यांनी चर्चची स्मशानभुमी सुशोभिकरणासाठी शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम व जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचेकडे मागणी केली होती. त्यानुसार श्री. येरम व श्री. वालावलकर यांची शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचेकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. या संदर्भात श्री. केसरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या विकास कामासाठी निधी देण्याची विनंती केली. त्यानुसार वेंगुर्ले दाभोलीनाका येथील शेकडो वर्षाच्या इमॅक्युलेट कन्फेक्शन चर्चच्या स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी स्थानिक आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी वैशिष्ट्यपुर्ण निधीतून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या मंजुर निधी संदर्भातील पत्र वेंगुर्ला नगरपरिषदेस प्राप्त झाले आहे.
सदर निधी प्राप्त करुन दिल्याबद्दल चर्चचे फादर फ्रान्सीस डिसोजा, माजी उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडीस, सामाजिक कार्यकर्ते मनवेल फर्नांडीस, सायमन आल्मेडा, आशु फर्नांडीस, बाबा संतान, सौ. आल्मेडा यांनी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत