*संवाद च्या बातमी नंतर बंद झालेला वेतोरे, ता.वेंगुर्ला येथील “अल्पेश” सोशल क्लब कालपासून पुन्हा सुरू*
*सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेला जुगार अड्डा बंद होणार का..?*
वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे गावात सुरू असलेला सोशल क्लब संवाद मीडियाच्या बातमीनंतर गेले काही दिवस बंद करण्यात आला होता. परंतु कालपासून दार बंद करून सदरचा सोशल क्लब पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती जागृत ग्रामस्थांकडून संवाद मीडियाला देण्यात आली.
ग्रामस्थांनी लक्ष वेधल्यानंतर संवाद मीडियाच्या प्रतिनिधीने वेतोरे सरपंच बंड्या पाटील यांच्याशी संपर्क साधून सदरच्या सोशल क्लबच्या परवानगी बाबत विचारणा केली असता, ग्रामसभेचा क्लबला परवानगी देण्याबाबत ठराव झालेला नाही, मात्र ग्रामपंचायत क्लबकडून कर आकारणी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु ग्रामपंचायत आकारणी करत असलेला कर सोशल क्लब चालविण्याकरीता की इमारत बांधकामासाठीचा आहे याबाबत ते खुलासा करू शकले नाहीत. तर आपण त्याबाबत चौकशी करून सांगतो असे उत्तर दिले. वेतोरे गावच्या पोलीस पाटील पदाचा चार्ज देखील खानोली गावातील पोलीस पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे गावचे पोलीस पाटील पद देखील रिक्त असल्याचे दिसते.
संवाद मीडियाला मिळालेल्या माहिती नुसार सदर सोशल क्लब सुरू असलेली इमारत ही लोकप्रतिनिधींची असून ग्रामपंचायत कर गोळा करते तो इमारतीचा बांधकाम कर असून सोशल क्लब चालाविण्याकरिता व्यावसायिक कर ग्रामपंचायत वसूल करत नसल्याने शासनाचा सुद्धा कर चुकविला जात असल्याचे दिसून येते. या सोशल क्लब मधील फर्निचर साठी गावातील एका व्यक्तीने २.०० लाख रुपये दिले असून आपले पैसे सोशल क्लब मध्ये अडकले असल्याने त्या व्यक्तीने क्लबला विरोध करू नका असा सूर लावला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. एकंदरीत सोशल क्लब च्या नावाखाली गावात सुरू असलेल्या अवैध्य जुगार अड्ड्यात अनेकांचे आर्थिक कनेक्शन असल्याचे दिसते आहे त्यामुळे सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असणारा हा अवैध्य जुगार अड्डा बंद होणार का..? असा प्रश्न जागृत वेतोरे ग्रामस्थांना पडला आहे.
*संवाद मिडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*