You are currently viewing भुताखेतांच्या गोष्टी (२ री )

भुताखेतांच्या गोष्टी (२ री )

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी श्री वि. ग. सातपुते लिखित कथा*

 

*भुताखेतांच्या गोष्टी (२ री )*

➖➖➖➖➖➖➖

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात *कलेढोण* म्हणून एक गांव आहे . तेथील एक सत्य घटना ( हे गांव म्हणजे ज्येष्ठ वाचस्पती ख्यातनाम व्याखाते कै . प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे गांव ) तेथील कै . राजारामबापू इनामदार हे माझ्या आत्याचे यजमान ते आमच्या लहानपणी नेहमीच आमच्या घरी येत असत . ही गोष्ट साधारणत: 65 वर्षापूर्वीची . आमच्या घरात म्हणजे वाड्यातच लाईटही नव्हती . पूर्वी चिमणी किंवा सुंदरी नावाचे तेलाचे वात लावलेले मंद प्रकाश देणारे मिणमिणते दिवे असत . हल्ली सारखे प्रखर दिवे नव्हते . तिन्हीसांज झाली की ,सगळीकड़े सामसुम होत असे . आम्ही सर्व भावंडे घरातच आई जवळ बसत असु . राजारामबापू आमचे कड़े नेहमी मुक्कामास असत .. मग रात्री जेवण झाले की ते आमचे वडिल , काका , माझ्या वडिलांचे मामा दामुमामा आणी दिगंबर मामा हे सर्वच रात्री निवांत सर्व प्रकारच्या गप्पागोष्टी मारीत असत . तेंव्हाच मी ऐकलेली एक गोष्ट . बापू हे सरपंच असल्यामुळे त्यांना सातत्याने त्यांच्या भागात रोज फिरती असे . त्यावेळी दळणवळणाचे एकच साधन म्हणजे फक्त सायकल अन बापू आजूबाजूच्या गावात त्यांच्या कामानिमित्त सायकल वरुन फिरत असत ..एक दिवस ते सर्व कामे उरकुन रात्री परत येत असताना तिथे *कान कात्रजचा* ओढा लागतो तिथपर्यन्त आले होते ..तेंव्हा बरीच रात्र झाली होती . त्या ओढयाच्या पुलावर त्यांना एका बाईने हाका मारल्या ,अन म्हणाली ” अव पावनं ,अव पावनं , वाईच थांबा , वाईच थांबा असे म्हणत त्यांच्या पाठी धावु लागली .. बापूंना हा प्रकार म्हणजे कानकात्रजच्या ओढयात एक *हडळ* आहे .अन ती अशी रात्री प्रवाशांना हाका मारते अन पकड़ते हे माहित होते .तेंव्हा त्या परीसरात थांबायाचे नाही .तो ओढयाचा पुल क्रॉस करुन पुढे जायचे .पुलावर थांबायचे नाही , जर थांबलाच तर तीने झपाटलेच समजायाचे . बापुंना ही गोष्ट लक्षात होती . बापुंचे उत्तम घाटदार कमावलेले शरीर आणी धीट स्वभाव यामुळे ती हडळ त्यांच्या मागे पळत होती तरी ते न घाबरता त्यांनी सायकल जोरात दामटली अन पुलाच्या पुढे आले ..,ती *हडळ* (पिशाच्य) पुलाच्या पुढे येवू शकले नाही .. बापू त्या फेऱ्यातून सहीसलामत बाहेर पडले …पण पुलाच्या बाहेर येई पर्यन्त सायकल जोरात दामटून घामाने निथळले होते ..मनातून घाबरले होते . हे त्यांनीच सांगीतले . ही गोष्ट ऐकताना आम्ही भाऊबहिणी मात्र घाबरून आई वडिलांना बिलगुन बसलो होतो ….हे सारे आठविते .

म्हणून प्रवासात कधीच आपण पुलावर अलिकडे थांबु नये . पुलाच्या पलीकडेच थांबावे असे शास्त्र संकेत आहेत ….

पुढे मीच 20 वर्षानंतर त्याच रस्त्याने माझ्या आत्ये बहिणीचे लग्न उरकून विनाकारण त्या दिवशी मुक्काम करायचा सोडून उगाचच रात्री जावा मोटरसायकल वरुन माझ्या भावा सोबत परत येत असता मला आलेला अनुभव पुढील सत्य कथेत मांडीत आहे ….👍👍👍👍

 

(क्रमशः)

 

*©वि.ग.सातपुते .(विगसा)*

२५ – ५ – २०१८

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा