*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कशी धजावेल जिव्हा*
नाही राखत लज्जा कृष्ण,
द्रौपदीचे होता वस्त्रहरण
सीतेच्या अपहरणासाठी टपले
कपटी, मायावी रावण
माणसांच्या जंगलात लागे, भय मनामध्ये दाटायला
कशी धजावेल जिव्हा, बाईपण भारी म्हणायला
सख्यासंगती सप्तपदी, गृहलक्ष्मीचा मान
गृहिणी असो वा कमावती, पदोपदी अपमान
जाचक बंधने, गृहीत धरणे, कवडीची किंमत मताला
कशी धजावेल जिव्हा, बाईपण भारी म्हणायला
उदो उदो नवरात्रीला, स्त्री-भृणहत्त्या सर्रास
बाजार शीलाचा पोटासाठी,
लांच्छनास्पद समाजास
अमृतमहोत्सवी वर्ष सरले, पंधरा ऑगस्ट एकोणिसशे तेविसला
कशी धजावेल जिव्हा, बाईपण भारी म्हणायला
पुराणातील, इतिहासातील, गाऊ स्त्रियांची महती
वर्तमानातही उंचच उंच, घेती भरारी स्त्रिया किती
तिच्या जगण्याची दुसरी बाजू, जेव्हा लागते छळायला
कशी धजावेल जिव्हा, बाईपण भारी म्हणायला
भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*