पुणे
‘ऐतिहासिक’ अशा पहिल्या ऑनलाईन विश्व मराठी संमेलनात अनेक भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. शेतकरी जीवन, जाणीवा, अनुभव विश्व, समस्या, आत्महत्या, जिद्द, कष्ट, ग्रामीणता, नवी आव्हाने लक्षात घेऊन या संमेलनातुन शेतकरी व्यक्त व्हायला हवा या साठी अनेक शेतकर्यांनी, संमेलनाचे पुणे जिल्हा प्रतिनिधी डाॅ नितीन पवार व शेतकरी सिंडीकेट संघटनेचे शेतकरी बापुसाहेब नलगे, कोरेगाव भिमा यांनी धरलेल्या आग्रहास संमेलन समिती ने आनंदाने तत्काळ होकार देत “शेतकरी कट्टा” हा शेतकर्यांच्या स्वतंत्र अभिव्यक्ती साठी संमेलन कार्यक्रमात सामील केला आहे.