You are currently viewing २७ ऑगस्ट रोजी वेंगुर्ल्यात मल्टी डिस्ट्रीक्ट भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा

२७ ऑगस्ट रोजी वेंगुर्ल्यात मल्टी डिस्ट्रीक्ट भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे आयोजन

 

वेंगुर्ला :

 

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ कॅश्यू सिटी दोडामार्ग, रोटरी क्लब ऑफ बांदा व रोटरॅक्ट सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रविवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत वेंगुर्ला शहरातील वेंगुर्ला हायस्कूल नजीकच्या मैदानावर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यातील १६ व्हॉलीबॉल संघाची मल्टी डिस्ट्रीक्ट स्पोर्ट रायला अंतर्गत भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट राजू वजराटकर यांनी पत्रकार परीषदेत दिली.

वेंगुर्ला येथील सिध्दीविनायक प्लाझा मधील सभागृहात रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन तर्फे मल्टी डिस्ट्रीक्ट स्पोर्ट रायला अंतर्गत तीन राज्यांतील १६ संघाच्या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाबाबतची माहिती, जिल्ह्यातील तमाम खेळाडू व रसिकांना व्हावी या उद्देशाने पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राजू वजराटकर, योगेश नाईक, संजय पुनाळेकर, राजेश घाटवळ, प्रथमेश नाईक, मुकुल सातार्डेकर, दिलीप गिरप आदी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी डिस्ट्रीक गव्हर्नर नासीरभाई बोरसादवाला, डिस्ट्रीक सेक्रेटरी ऋषिकेश खोत, स्पोर्ट सेक्रेटरी संजय साळोखे, डीसीसी राजेश घाटवळ, डीआरसीसी राज खलप, असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे, असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, डीआरआर प्रांजल मराठे, एनआयएस कोच व इंटरनॅशनल रेफरी अतुल सावडावकर आदी वरीष्ठ रोटरी पदाधिकारी खास उपस्थित रहाणार आहेत.

या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रु. १५ हजार व उपविजेत्या संघास रोख रू १० हजार तसेच कायम स्वरूपी चषक तसेच बेस्ट मँशर, बेस्ट लिफ्टर, बेस्ट टॉसर, बेस्ट लीबरो यासाठी चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या स्पर्धेत तिन्ही राज्यातील प्राधान्याने सहभागी होणाऱ्या १६ संघानाच प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी प्रा. हेमंत गावडे- ९४२१२३५१२८ यांचेशी संपर्क साधावा. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी सिंधुदुर्गातील व्हॉलीबॉल खेळाडू व रसिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष राजू वजराटकर व सचिव योगेश नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा