You are currently viewing कुडाळ केळबाई मंदिरकडे जाणार्‍या रस्त्यावर माऊली काॅम्प्लेक्स समोर नगरपंचायतीने बांधलेल्या मोरी (पुल) म्हणजेच उड्डाणपूला मुळे होत आहेत अपघात…….

कुडाळ केळबाई मंदिरकडे जाणार्‍या रस्त्यावर माऊली काॅम्प्लेक्स समोर नगरपंचायतीने बांधलेल्या मोरी (पुल) म्हणजेच उड्डाणपूला मुळे होत आहेत अपघात…….

निकृष्ठ दर्जाच्या बांधलेल्या या मोरीची (पुलाची) तातडीने पाहणी करून उंची कमी करावी अशी मागणी नगरसेवक गणेश भोगटे व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

कुडाळ

कुडाळ नगरपंचायतीने केळबाईवाडी रस्त्यावर माऊली काॅम्प्लेक्स समोरील बांधलेली मोरी (पुल) अपघातास आमंञण देत आहे. या मोरीची तात्काळ दुरुस्ती करुन त्याची उंची कमी करण्यात यावी,अशी मागणी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी तसेच वाहनचालकांमधून होत आहे. तर या निकृष्ठ दर्जाच्या बांधलेल्या मोरीची पाहणी नगरसेवक गणेश भोगटे यांनी केली. यावेळी महेश सावंत,बाबा सावंत व इशुफ शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते.

तसेच कुडाळ नगरपंचायतीने बांधलेली ही मोरी (पुल) सदोष असल्याचे मत नागरीक व्यक्त करतात, तर या मोरीची उंची अधिक असल्याने वारंवार अपघात घडत आहेत.याची तात्काळ दखल कुडाळ नगरपंचायतीने घेऊन सदरची मोरी तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नगरसेवक भोगटे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − seven =