You are currently viewing गोवा बनावटीच्या दारूमध्ये मुंग्या आणि कचरा….

गोवा बनावटीच्या दारूमध्ये मुंग्या आणि कचरा….

सावंतवाडीत तळीरामांचा राडा…

 

सावंतवाडी :

गोवा बनावटीच्या भेसळयुक्त दारूचा सुळसुळाट संपूर्ण जिल्ह्यात झाला आहे. सावंतवाडी शहर आणि तालुक्यात तर गावागावात गोवा बनावटीच्या भेसळयुक्त दारूचे व्यवसाय चालतात. गोव्याची दारू सावंतवाडीत आणून त्यात बाटलीचे झाकण आणि लेबल बदलून तर कधी दुसऱ्या बाटलीत मोठ्या बाटलीतील दारू भेसळ करून भरली जाते, आणि अशाप्रकारे भरलेल्या दारूचा दर्जा तर पिण्यालायक नसतोच याचाच प्रत्यय आज सावंतवाडी तालुक्यातील एका गावात अडीच लिटर च्या बाटलीतील दारू ओतून तळीरामांना देताना समोर आला.

सावंतवाडी तालुक्यातील एका गावातील काही तळीराम गोवा बनावटीची स्वस्त दारू भेटते अशा गावातीलच एका दारू व्यापाऱ्यांकडे गेले असता, अडीच लिटर च्या मोठ्या बाटलीतील दारू छोट्या क्वार्टर मध्ये ओतून देताना बाटलीत मेलेल्या मुंग्या, किटक आणि कचरा दृष्टीस पडला. विकत घेतलेल्या दारू मध्ये मुंग्या, कचरा असल्याने तळीरामांना तिथेच राडा केला. त्यामुळे गोवा बनावटीची स्वस्त मिळणारी दारू ही भेसळ करूनच विकली जाते यावर शिक्कामोर्तब झाला. भेसळयुक्त दारूच्या बाटलीत मुंग्या, कचरा आढळल्यानंतर तळीरामांनी राडा केला.

मॅकडॉल नंबर 1 या ब्रँडच्या दारूच्या बाटलीत कचरा मुंग्या आढळल्याने या दारूच्या ब्रँड वरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गोवा बनावटीच्या या दारूच्या बाटलीचे लेबल मध्यभागी खरडलेले असून भेसळयुक्त दारू भरून मोठ्या शिताफीने या बाटलीचे झाकणे लावली जातात, त्यामुळे ओरिजनल आणि भेसळयुक्त दारू ओळखणे देखील मुश्किल बनले आहे. स्वतः गडगंज पैसा कमविण्याच्या नादात अवैद्य धंदा करणारे मात्र तळीरामांच्या घशात भेसळयुक्त दारू उतरवून त्यांना मरणाच्या दारात लोटत आहेत. अवैद्य धंद्यांवर होणारी २/४ दिवसांची दिखाऊ कारवाई होऊन या धंद्यांचा नायनाट होणार नाही तर खरोखरची कठोर कारवाई झाली तरच अवैद्य दारू धंद्याला आळा बसेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा