You are currently viewing आता मव्हं काय?

आता मव्हं काय?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य लेखक कवी गझलकार श्री.जयराम धोंगडे यांनी डॉ.देविदास तारू यांच्या “आता मव्हं काय?” या आत्मकथेचा केलेला रसास्वाद*

■■■■● रसास्वाद ९ ●■■■■

आता मव्हं काय?
आत्मकथन: डॉ. देविदास तारू

रस्त्यावरील वाटसरूंना अडवून त्यांना लुटणे आणि मारून टाकणे व त्या लुटलेला धनावर आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या वाल्याने एक माणूस मारला की एक खडा टाकावा, असे सात रांजण खड्याने भरले होते. असा तो क्रूरकर्मा होता. त्याच्या जीवनात नारदमुनीसारखा गुरू आला आणि ‘तू करीत असलेल्या पापात घरी कुणी त्याचा वाटेकरी आहे का?’ एवढे विचारून यायला त्याला सांगितले. सर्वांनी हात वर केले. कुणी त्याच्या पापाचा भागीदार व्हायला तयार नव्हता. ना बाप, ना आई, ना बायका-मुले… त्याला सत्याची जाणीव झाली. आपल्या कर्माचे आपणच शिल्पकार असतो. त्याला उपरती झाली आणि नारदासारख्या सद्गुरूमुळे त्याचा जीवनोद्धार झाला. पुढे ते रामायणाचे रचियता आणि ‘महर्षी वाल्मिकी’ म्हणून प्रसिद्ध झाले. ही पुराणकथा आपण ऐकून, वाचून आहोत.

माझे मित्र डॉ.देविदास तारू यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली आत्मकथा ‘आता मव्हं काय?’ वाचण्यात आली. वाल्याला नारदमुनी भेटले. ‘राम’नामाचा गुरुमंत्र भेटला आणि त्याचे जीवन परिवर्तन झाले. पण या ‘दैदास्या’चा गुरू तो स्वतःच झाला आणि ‘आता मव्हं काय?’ हा त्याचाच प्रश्न त्याच्या जगण्याचा मूलमंत्र ठरला.

माणसाने कुठं जन्म घ्यावा हे माणसाच्या हाती नसतं. पण आपल्या जन्माची आपण माती करायची की सोनं करायचं हे मात्र फक्त माणसाच्याच हाती असतं. जसं आहे तसं अगदी प्रांजळपणे, काहीही हातचं राखून न ठेवता कथन केलं की ते कथन थेट काळजाला भिडतं. अशीच काळीज फाडणारी आणि मनावर घेतलं तर माणूस आकाशालाही गवसणी घालू शकतो असा उर्जादायी संदेश देणारी ही संघर्षाची आत्मकथा एकाच बैठकीत वाचून मी कधी हातावेगळी केली ते कळलेही नाही.

पहिल्या बायकोला मूल होत नाही म्हणून नवऱ्याने दुसरी बायको केली… दुसरीलाही मुलं झाली… आणि मग पहिलीलाही मूल झालं… असा या ‘देविदास’ चा जन्म दलित परिवारात झाला. व्यसनी बाप… दोन बायका… टोकाचा सवतीमत्सर… अशिक्षित मायबाप आणि अठराविश्व दारिद्र्यात ‘दैदास्या’चे बालपण होरपळून निघालं! स्वतःची जन्मदात्री माय, लेकरू रडू नये म्हणून त्याला झोपी घालण्यासाठी अफूची गोळी द्यायची… का? तर काम बुडू नये… काम नाही केलं तर पैसा नाही, पैसा नाही तर भाकरी नाही… मरता मरता देविदास वाचला.

‘धाक ना धगारा, फुटका नगारा’ म्हणतात तसं देवीदासचं बालपण होतं… भाकरीसाठी माय चौकात बसून भाजीपाला विकायची, बाप दुसऱ्या बायकोच्या प्रेमात म्हणून पहिली बायको म्हणजे देवीदासची आई आणि देविदास त्यांच्यापासून अलग राहायचे… त्यामुळे याच्यावर बापाचाही धाक नसायचा… त्यामुळे शाळेत जायच्या वयात उनाडक्या करीत बाल वयाचे मातेरे झाले. भांडणं, मारामाऱ्या, चोऱ्याचपाट्या, मंदिरातून चपला-बूट पळविणे, पैसे चोरणे, गोट्या खेळणे, जुगार अड्ड्यावर ‘हरकाम्या’ अशा कामात बालमन गढूळ होत राहिले. जुगाऱ्यांना विडीकाडी आणून देत हा ही विड्या आणि त्याची थोटके ओढायला शिकला. ही मजल दारू पिण्यापर्यंत गेली. कारण त्याच्याकडे लक्ष द्यायला मायबापाकडे वेळ नव्हता. नांदेडच्या डंकीन म्हणून गोदातटावरील असलेल्या घाटावर पोहणे, मासे-खेकडे पकडणे, पुरात पोहणे असे नाही नाही ते प्रकार या बाल ‘दैदास्या’ने केले.

परिस्थिती व संगतीने बिघडलेल्या ‘देविदास’च्या जीवनात
नियतीने जे काही लिहिलं ते खोडून काढण्यात तो सफल झाला. विहारात प्रार्थना घेणारे श्री गोविंद वन्ने यांनी प्रार्थनेत बसलेल्या ‘दैदास’ला इतर मुलांप्रमाणे जेंव्हा विचारलं, ‘पुढे तू काय करणार?’… इतर मुले पटापट सांगू लागली की त्यांना काय व्हायचंय! पण हा निःशब्द होता… टवाळक्या व उनाडक्याच त्याचा छंद आणि धंदा! फक्त हा पुटपुटला ‘आता मव्हं काय?

आता माझं काहीच नाही का? माझा जन्म असाच वाया जाणार का? मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी झाला? मला काय व्हायचं आहे? याचे चिंतन, मनन त्याला स्वस्थ बसू देईना! ‘दैदास्या’ला ‘देविदास’ संबोधणारे ‘गोविंद वन्ने’ त्याच्या जीवनाला कलाटणी देऊन गेले. आता देविदास शाळेत जाऊ लागला.

उपजत हुशार, तल्लख बुद्धिमत्ता, भजनगायनाचा छंद, परोपकारी वृत्ती या निसर्गदत्त गुणामुळे ‘गंजून’ गेलेलं हे लोखंड पुढे शिवाजी हायस्कुल, प्रतिभानिकेतन महाविद्यालय, एन एस एस च्या भट्ट्यातून तावूनसुलाखून निघालं. स्वतःच्या असामान्य ‘कर्तृत्वाने’ शिक्षणाच्या एक एक पायऱ्या चढत, प्रसंगी १८ नंबरचा फॉर्म भरून एकदम तीन पायऱ्यांची ‘छलांग’ घेत दहावी झाला. उत्तम ‘वक्तृत्वाच्या’ जोरावर एनएसएस आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेत पोहचला. जाणत्या ‘नेतृत्व’ गुणामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मंत्र्यांना घेराव घालण्यासाठी मोर्चा काढला. तो यशस्वी झाला. आपले जीवनानुभव जश्याचे तसे चारचौघात उजागर करून जीवन संघर्ष काय असतो आणि त्याचा मुकाबला कसा करावा लागतो याचा वस्तुपाठ बेफिकिरपणे सांगण्यासाठी, आपले विचार दान करणाऱ्या डॉ. देविदास तारू यांचा हा असा ‘दातृत्व’ गुण मला भावला आहे.

कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या चार स्तंभावर आपल्या यशाची गगनचुंबी जीवन इमारत उभी करणारा, कधीही हा ‘वाल्या’ ‘वाल्मिकी’ होऊ शकणार नाही असे बालपण नशिबी आलेला ‘दैदास्या’ ‘देविदास’ झाला. बी.ए., बी.एड., एम.ए., एम.एड., पीएच.डी. आणि कोणेकाळी शिक्षणापासून वंचित झालेला हा जीव आज महाराष्ट्र शासनाचा ‘शाळासिद्धी राज्य प्रशिक्षक’ म्हणून राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट अधिकारी, गट शिक्षणाधिकारी अशा प्रकारच्या पाच दहा हजार लोकांना प्रशिक्षण देतो.

भावा! सलाम तुला… तुझ्या जिद्दीला… आणि तुझ्यातल्या जिवंत माणुसकीला!

मित्र हो! हा ‘जीवनबोध ग्रंथ’ आपल्या संग्रही असू द्या… हा नक्की आपल्याला तारेल… संकटावर मात करण्याची या काळाची ‘गीता’ सांगेल… काय काय सांगू… ही कहाणी तुम्हीही वाचा… आणि असे वाचाल तर नक्कीच वाचाल…. एवढं मात्र ठासून सांगतो…. थांबतो!

जयराम धोंगडे, नांदेड

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा