तळेबाजार शाखेच्या एटीएमचे उत्साहात लोकार्पण
देवगड
सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून साधता येणार आहे. यातूनच जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखेच्या एटीएम सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार तथा बँकेचे माजी संचालक अजित गोगटे, संचालक प्रकाश बोडस, विठ्ठल देसाई, समीर सावंत, वरेरी सरपंच श्रीमती प्रिया गोलतकर, तळवडे सरपंच पंकज दुखंडे, लिंगडाळ सरपंच श्रीमती सायली सावंत, चांदोशी सरपंच दिपाली मेस्त्री, वानिवडे विकास सोसायटीचे चेअरमन गोविंद जयवंत लाड, बापार्डे विकास सोसायटी चे चेअरमन अजित राणे, पुरळ विकास सोसायटी चे चेअरमन रवींद्र तिर्लोटकर, गढी ताम्हाणे विकास सोसायटी चे चेअरमन दिपक धुरी, टेंबवली सरपंच हेमंत राणे, पेंढरी सरपंच मंगेश आरेकर, पोलिस पाटील अनिल लाड, भाई आचरेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की, जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक, शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहीजे. हा दृष्टीकोन जिल्हा बँकेने ठेवला असून बँकींग व्यवसायात सातत्याने नवनवीन प्रयोग करणं आवश्यक आहे. यासाठी डीजिटल बँकींग चा पर्याय अधिकाधिक तत्पर सेवा देण्यासाठी वापरला गेला पाहिजे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज डोअर स्टेप बँकींग ची सेवा देणारी सिंधुदुर्ग बँक ही राज्यातील पहिली बँक असून अल्पबचत प्रतिनिधी मार्फत आजारी, वयोवृध्द ग्राहकांना घरबसल्या बँकींग सुविधा दिल्या जात आहेत.
प्रारंभी एटीएम् चे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर बँकेचे संचालक प्रकाश बोडस यांनी प्रास्ताविक करताना तळेबाजार शाखेच्या व्यवसायाची माहिती दिली व शाखेने कलेली प्रगती म्हणजे ठेवीदार आणि ग्राहकांनी बँकेवर टाकलेला विश्वास असल्याचे सांगून उपस्थितांना बँकेच्या प्रगतीत आपला सहभाग नोंदवा व बँकींग सुविधांचा लाभ घेत तळेबाजार शाखेकडील आर्थिक व कर्ज व्यवहार, ठेवी वाढविण्यासाठी मोलाची साथ देण्याचे आवाहन उपस्थितांना यावेळी केले.
यावेळी बँकेचे खातेदार विश्वास सावंत, बलराम कदम, उत्तम सुतार, नागेश दुखंडे, सतिश तोरसकर या बँकेच्या पाच ग्राहकांना एटीएम कार्ड वितरित करुन शुभारंभ करण्यात आला.
*संवाद मिडिया*
*प्रवेश सुरू..प्रवेश सुरू.. 2023 – 2024*🏃♂️🏃♀️
*पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी…*
*डॉ. आठवले कॅम्पस*
🩸 *D.M.F Paramedical Institute-DEVGAD*🩸
*_कॅम्पस कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने खालील कोर्सेस उपलब्ध_*
*_♻️कोणत्याही शाखेच्या बारावी पास विद्यार्थ्यांसाठी_*♻️
🔹 डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री
*♻️दहावी पास विद्यार्थ्यांसाठी♻️*
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन डायलिसिस टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑप्टोमट्री
*✅कोर्सचा कालावधी १ वर्ष* 1️⃣
*🔰आवश्यक कागदपत्रे 🔰*
💠लिव्हिंग सर्टिफिकेट
💠 दहावी व बारावी पास माार्कलिस्ट
💠दोन आयकार्ड साईज फोटो
💠आधार कार्ड झेरॉक्स
*🏬सुसज्य अत्याधुनिक लायब्ररी*
*🔬आधुनिक डायरेक्ट डिजिटल एक्स-रे प्रणाली*
*🕴️उच्चशिक्षित प्रशिक्षक*
*📚डिजिटल लायब्ररी*
*💸’हप्त्याने फी भरण्याची सोय*
*संपर्क*👇
*देवगड मेडिकल फाउंडेशन*
*📲 7382821000*
*📲 7382822000*
*⏰सकाळी 9 ते 12 वा. | दुपारी 3 ते 6 वा*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/105854/
———————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*