You are currently viewing गझलकार श्री.जयराम धोंगडे यांचा पाचवा “मराठी गझलसंग्रह”… येतोय वाचकांच्या भेटीस

गझलकार श्री.जयराम धोंगडे यांचा पाचवा “मराठी गझलसंग्रह”… येतोय वाचकांच्या भेटीस

*”मी छंदी मी स्वच्छंदी” ला डॉ.श्रीपाल सबनीस यांची लाभली प्रस्तावना*

 

■ लवकरच मराठी गझलकार श्री.जयराम धोंगडे यांचा पाचवा आणि या वर्षातला दुसरा ‘मराठी गझलसंग्रह’, *”मी छंदी मी स्वच्छंदी”* प्रकाशित होतो आहे!

केवळ ‘आनंदकंद’ वृत्तातील एकूण ८० गझल असणाऱ्या या संग्रहात प्रत्येक गझलेच्या मतल्याचे आद्याक्षर ‘अ’पासून ‘ज्ञ’ पर्यंत घेऊन रचना केल्या आहेत! या संग्रहाला ८९ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष, थोर विचारवंत आणि जेष्ठ साहित्यीक डॉ.श्रीपाल सबनीस सरांची प्रस्तावना लाभली आहे! यापूर्वी जयराम धोंगडे यांचे “जय बोले”, “कोरोणायान”, “शब्दाटकी” “तिपेडी” असे चार मराठी काव्य आणि गझल संग्रह प्रकाशित झाले असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील व्यथा वेदना…शेतकरी कष्टकरी लोकांची दुःख अतिशय भावस्पर्शी शब्दात मांडली आहेत. या चार पुस्तकांच्या अफाट यशानंतर गझलकार जयराम धोंगडे यांचा पाचवा गझल संग्रह “मी छंदी मी स्वच्छंदी” लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे.

‘शब्दश्री प्रकाशन, पुणे’ यांनी प्रकाशनसिद्ध केलेल्या या संग्रहात एकूण पृष्ठांची संख्या ९६ असून याचे स्वागत मूल्य ₹२००/- आहे. प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास पोस्टेज/ कुरियरच्या आगाऊ खर्चाशिवाय ₹२००/- मध्ये हा संग्रह घरपोच पाठविला जाईल!

■ 9422553369 या ‘फोन पे / गुगल पे / पेटीएम’ नंबरवर आपण पैसे पाठवू शकता! आपण पैसे पाठवल्याचा ‘स्क्रीन शॉट’ आणि आपला पूर्ण अचूक ‘पोस्टल ऍड्रेस’ 9422553369 या व्हाट्सअप्प नंबरवर पाठवावा!

चला तर मग, मित्र हो! आजच आपली प्रत ‘बुक’ करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा