You are currently viewing भाजप नेत्यांची गोळ्या घालून जागीच हत्या; तर मुलावरही चाकूने वार प्रकृती चिंताजनक…

भाजप नेत्यांची गोळ्या घालून जागीच हत्या; तर मुलावरही चाकूने वार प्रकृती चिंताजनक…

भाजपा नेते आणि आरटीआय कार्यकर्ते जुल्फिकार कुरैशी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या हल्ल्यात त्यांचा मुलगा ही गंभीररीत्या जखमी झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दिल्लीतील नंदनगरी परिसरातील सुंदरनगरी येथे आज सकाळी 7 च्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला.

 

जुल्फिकार हे सकाळी नमाज पढण्यासाठी जात असताना असताना त्यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. तसंच हल्लेखोरांनी जुल्फिकार कुरैशी यांच्या मुलावरही चाकूनं हल्ला केला ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मशिदीच्या बाहेरच ही घटना घडली. दिल्ली पोलिसांनी भाजपा नेते जुल्फिकार कुरेशी यांच्या मुलाला स्वामी दयानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. हल्लेखोर अगोदरपासूनच घटनास्थळावर घात लावून बसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. कुरैशी इथं दाखल होताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी या हल्ल्याची चौकशी सुरू केली आहे.

 

जुल्फिकार कुरैशी जागीच ठार झाल्याने यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून, कुटुंबीयांकडे चौकशी केली जात आहे. जुल्फिकार यांनी काही दिवसांपूर्वी एका बिगर सरकारी संस्थेची स्थापना केली होती. तसंच माफिया आणि मादक पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात त्यांनी मोहीम उघडली होती. उल्लेखनीय म्हणजे जुल्फिकार यांच्यावर याआधीही अनेकदा हल्ले घडवून आणण्यात आले होते. त्यामुळे हल्लेखोरांचा त्यांच्या हत्येमागे काय हेतू होता, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.  जुल्फिकार भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चा आणि संघाशी निगडीत इंद्रेश कुमार यांच्या कुटुंबाशी निगडीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा