साटेली गावठणवाडी व सुतारवाडीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून साटेली-भेडशी परमे रोड वरील बुजविले खड्डे..
* स्थानिक प्रशासना बाबत नागरिकांनी व्यक्त केला रोष*
दोडामार्ग
गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे साटेली गावठणवाडी आणि सुतारवाडीतील युवक आणि ग्रामस्थांनी करुन दाखवले या दोन्ही वाडीतील युवकांनी एकत्र येत साटेली भेडशी ते परमे घोटगे पुल या दरम्यानच्या रस्त्यावरील पडलेले खड्डे श्रमदानातून बुजवले.
गेल्या अनेक दिवसांपासुन साटेली ते परमे रस्त्यावर खड्डे पडले होते याबाबत स्थानिक प्रशासनास वारंवार कल्पना देऊन देखिल यावर कोणतीही हालचाल किंवा कार्यवाही न झाल्यामुळे अखेर युवकांनी एकत्र येत रस्त्यावर पडलेले खड्डे स्वतःहून पुढाकार घेत गटारांची साफ सफाई करत रस्त्याच्या बाजूला आलेली झाडी देखिल तोडून रस्ता वाहतुकिस मोकळा करुन दिला. यावेळी भिकाजी गणपत्ये, शिवराम धर्णे, मंदार गणपत्ये, ओंकार ठाकूरदेसाई, एकनाथ धर्णे, अनिकेत सुतार, रवी धर्णे, योगेश धर्णे, मंदार नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यादरम्यान मात्र स्थानिक प्रशासनाच्या गलथन कारभाराबाबत नागरिक आणि वाहनचालकांमधुन तिव्र संताप व्यक्त करण्यात आला.