You are currently viewing मराठा आरक्षणाबाबत योग्यवेळी बोलेन…

मराठा आरक्षणाबाबत योग्यवेळी बोलेन…

– उदयनराजे भोसले

बांदा
मराठा आरक्षणाबाबत ‘आता नाही, योग्यवेळी बोलेन, पण सपाटून बोलेन’ असा सुचक विधान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बांदा येथे पत्रकारांशी बोलताना केले. त्यांच्या इशाऱ्यामुळे भविष्यात राज्य सरकारला उदयनराजे यांच्या चौफेर टीकेला तोंड द्यावे लागेल.
बांदा येथे मराठा समाज अध्यक्ष राजाराम सावंत यांच्या निवासस्थानी घेतलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठा समाजाचे पदाधिकारी व भाजपचे नेते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा