माझा देश भारत
उर्फ हिंदुस्थान ||१||
विविधतेने नटलेला
एकतेने सजलेला ||२||
माझा भारत
ज्याच्यासाठी शूरवीरांनी
अर्पिले आपले प्राण ||३||
तोच माझा भारत
गंगा, यमुना वाहती
ज्याच्या कुशीत ||४||
तोच माझा भारत
हिमालयाची शिखरे
राहती ज्याच्या सहवासात ||५||
तोच माझा भारत
सुंदर शेती पिकती
ज्याच्या भुमिवरती ||६||
तोच माझा भारत
शौर्याने, बुद्धीने
परंपरेने भरलेला देश ||७||
माझा भारत
सर्वांना वाटतो
ज्याचा अभिमान ||८||
तोच माझा भारत
सर्वांना प्रिय आहे
जो देश ||९||
तोच माझा भारत देश
तोच माझा भारत देश
*कवयित्री दुर्वा दत्ताराम नाटेकर*
इयत्ता चौथी
केंद्र शाळाबांदा नं१ ता.सावंतवाडी