You are currently viewing युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जिल्हाध्यक्ष सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला प्रवेश..*

वैभववाडी

जिल्हाध्यक्ष सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती वैभववाडी येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे राष्ट्रवादी काॕग्रेस मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी सामंत बोलत होते.यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली  वैभववाडी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
भाजपा समाजा समाजात तेड निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजुन घेत आहे. जनतेने आता त्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. त्यांचे सुडाचे राजकारण थांबविण्यासाठी सर्वांनी एकञ आले पाहीजे. असे आवाहन राष्ट्रवादी काॕग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले.
यावेळी प्रांतिक सदस्य निखील गोवेकर,तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नझीर शेख, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी भोगळे, कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, कणकवली विधान सभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, वैभववाडी शहर अध्यक्ष श्री.शिंदे आदी उपस्थित होत.
यावेळी वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे, कोळपे प्रभागातील नासीर रमदुल, निजाम बोबडे,रमजान फरास, बाबालाल रमदुल, समीर रमदुल, जबीदा रमदुल, हसिना फरास, फातिमा चोचे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष सामंत म्हणाले, राष्ट्रवादी काॕग्रेस समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करीत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कणखर नेतृत्वाखाली पक्ष काम करीत असून सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी झगडत आहे. भाजपा सुडाचे राजकारण संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनी एकञित होणे गरजेचे आहे. आपण राष्ट्रवादी पक्षावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे राहु असे आश्वासन सामंत यांनी दिले. तर युवक अध्यक्ष विशाल जाधव म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादी काॕग्रेस पक्ष घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार. युवकांचे संघटन अधिक मजबूत करुन युवकांचे प्रश्न या माध्यमातुन सोडविण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या स्थानिक पातळीवरील निवडणूकांसाठी युवकांमध्ये जागृती करून त्यांना राजकीय प्रवाहात सक्रीय करणार आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पुरोगाणी विचार घराघरात पोहचवून पक्ष संघटन अधिक बळकट करणार  असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा