सिंधुदुर्गातील आज होणाऱ्या प्रत्येक तालुकातील बैठकीत मोर्चाचे नियोजन
– परशुराम उपरकर – माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस
वीज बिलामध्ये सवलत मिळावी अशी मागणी सर्वप्रथम आपल्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी केली होती.आपल्या सिंधुदुर्गात सुद्धा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने देखील झोपेचे सोंग घेतले असतानाच कोरोना काळात वीजबीलमाफीसाठी अनेक ठिकाणी मनसे आंदोलने झाली.मागणी लावुन धरली. पक्षाच्या राज्यातील अनेक पदाधिकारी यांनी सुद्धा अनेक निवेदने, आंदोलने केली.राज्यात महावितरण कार्यालयावरही तोडफोड केली. परंतु निगरगट्ट राज्य शासनाने दखल घेतली नाही.
याउलट राज्य शासनाचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी वीज बिलामध्ये सवलत मिळणार नाही, अशा प्रकारचे शासनाची भुमिका असल्याचे जाहीरपणे प्रसारमाध्यमांसमोर वक्तव्य केले आहे. या संदर्भात आपल्या मनसे पक्षाचे अध्यक्ष मा.राज साहेब ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.मा.राजसाहेबांच्या आदेशानुसार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येसुद्धा येत्या गुरुवारी दि.२६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
तरी आज तालुकास्तरावर होणाऱ्या बैठकीमध्ये गुरुवार दि.२६ नोव्हेंबरच्या मोर्चाचे नियोजन करणेत यावे.
तसेच सदर बैठकीस तालुकाध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष, विद्यार्थी सेना, महिला आघाडी तसेच आजी-माजी महाराष्ट्र सैनिक यांनाही बैठकीस निमंत्रित करावे, असे आवाहन परशुराम उपरकर, माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस यांनी केले आहे