दिरंगाईच्या चक्रात कळवा हॉस्पिटल, आरोग्याचा प्रश्न.
ठाणे:-
रविवारी १३ ऑगस्टला इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर दिवसभर कळवा हॉस्पिटल गाजत होते. घटना अशी होती, शनिवार ते रविवार या मधल्या दहा तासांमध्ये कळवा हॉस्पिटलच्या दिरंगाईमुळे सतरा ते अठरा पेशंट मृत्युमुखी पडले. त्यातले काही पेशंट जनरल वॉर्ड मध्ये होते तर काही आयसीयूमध्ये परंतु डॉक्टरांनी त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट न दिल्याने. पॅरॅलिसिस आणि इतर गंभीर आजार होऊन त्यांनी या हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. काल काही ठाण्यातील विरोधी पक्ष नेते. या हॉस्पिटलला भेट देऊन दिले. त्यांनी या हॉस्पिटलची पूर्ण तपासणी केली. डॉक्टरांना प्रश्न विचारले पण त्याची समर्पक उत्तरे त्या डॉक्टरांकडे तथा नर्स स्टापकडे नव्हती.
विरोधक मंडळींचे असे म्हणणे होते. या कळवा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा आणि इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. म्हणून या घटना सातत्याने घडत आहेत. ठाण्यातील सिविलहॉस्पिटल बंद असल्याने, दिवसेंदिवस गरीब, मध्यमवर्गीय पेशंट आपले आरोग्य उत्तम व्हावे. याकरता कळवा हॉस्पिटलमध्ये सरकारी ट्रीटमेंट घेतात. त्यांची अपेक्षा असते कमीत कमी खर्चात आम्हाला चांगले उपचार मिळावेत. कारण लोक नेहमी पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकताना, हेच लक्षात घेतात. हल्लीच्या काळात सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती सुधारली आहे. ही सुधारणा खरोखर दिसून येत आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास सरकारी आरोग्य व्यवस्थेवर बसला आहे. हे कोणालाही विसरता येणार नाही.
अशा परिस्थितीत जर या प्रगतशील ठाणे शहरात छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालयात पेशंटची गैरसोय होऊन ते मृत्यूमुखी पडत असतील,
तर ठाण्यातील महापालिका प्रशासन व्यवस्थेने जागे झाले पाहिजे, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इर्शाळवाडी
दुर्घटनेच्या वेळी, स्वतः पुढे जाऊन रेस्क्यू ऑपरेशनचे नेतृत्व करतात. यामुळे परिणामकारक चांगली लोकसेवा घडवून, आपत्तीग्रस्तांना ताबडतोब जलद मदत भेटू शकते, तर मग ठाण्यातील त्यांच्या मावळ्यांनी हजारो हातांनी जनतेची, रुग्णांची किती मोठी सेवा केली पाहिजे. हे या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी
जनतेच्या सोयी सुविधेसाठी चांगल्यात चांगले प्रयत्न करत असतील, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले पाहिजे. त्यातून त्यांची योजना कार्यान्वित केली पाहिजे. शेवटच्या माणसापर्यंत आरोग्याच्या किंवा इतर सोयी सुविधा पोचवल्या पाहिजेत. तरच या दोघांचे कार्य पूर्णत्वाला जाईल. म्हणून कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून. महापालिका प्रशासनला सहकार्य करून, कळवा हॉस्पिटलचा आनागोंदी कारभार संपुष्टात आणला पाहिजे. कारण कळवा हॉस्पिटलच्या बाबतीत लोक म्हणतात. या सरकारी हॉस्पिटलमध्ये मरण स्वस्त झाले आहे. जो या हॉस्पिटलमध्ये आला, तो कायमचा गेला, असे होऊ नये. याकरता सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. मागच्यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली होती. परंतु तरीही दिरंगाईचे सत्र थांबत नाही. म्हणून या हॉस्पिटलची देखरेख महाराष्ट्र सरकारने हाती घ्यावी. असे सामान्यतील सामान्य लोकांना वाटते आहे. अनेक पत्रकारांचे हेच म्हणणे आहे. या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नक्कीच हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. यातून लवकरात लवकर या कळवा हॉस्पिटलची परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त करूया.
पत्रकार रुपेश पवार
99 30 85 21 65