मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
योगा फाऊंडेशन संचालित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत “महायोगोत्सव – २०२३ नागपूर” ह्या राज्यस्तरीय ऑनलाईन व ऑफलाईन योगासन स्पर्धा- २०२३ चे आयोजन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सर्व योगपटू व खेळाडूंसाठी ही एक आनंदाची बातमी असून त्यांना खेळण्यासाठी महाराष्ट्र योगशिक्षक संघाने एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. सन २०२० मधे भारत सरकारने योगासनांचा समावेश क्रीडा प्रकारात केला आहे. तसेच महाराष्ट्र शासन देखील योगासनांचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त खेळाडू व योगपटूंनी या सुवर्ण संधींचा लाभ घेऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, महायोगोत्सव समितीचे राज्याध्यक्ष विनायक बारापात्रे, स्थानिक नियोजन समितीचे अध्यक्ष लता होलगरे तसेच राज्य उपाध्यक्ष तथा योग क्रीडा समिती व स्पर्धा प्रमुख राहुल (अंबादास) बी. येवला यांनी केले आहे.
सदर स्पर्धा फक्त पारंपरिक योगा प्रकारात (ट्रेडिशनल योगा) घेतली जाणार आहे. यात उपांत्य फेरी ऑनलाईन पध्द्तीने होईल तर अंतिम फेरी नागपूर येथे ऑफलाईन घेतली जाणार आहे.
*वयोगट*
१) मुले व मुली : वय ७ ते १५
२) मुले व मुली: वय १६ ते २५
३) पुरुष व महिला : वय २६ ते ४०
४) पुरुष व महिला : वय वर्षे ४१ च्या पुढे
*बक्षीसांचे स्वरूप*
अंतिम फेरीत निवड झालेल्या प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ विजेता खेळाडूंना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी राज्य स्पर्धा समिती सदस्यांशी नितीन खैरनार ९८९०४३०५७४, आरुषी शिंगोटे ९९२२४१७४८२, मंदार भागवत ७७२००५२५२७, अर्चना कवठेकर ९४०३५७२००१ यांच्याशी संपर्क साधावा.
नावनोंदणी अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. स्पर्धेची उपांत्य फेरी ऑनलाइन पद्धतीने रविवार, दि. १७ सप्टेंबर २०२३ ला होणार आहे. तसेच स्पर्धेची महाअंतिम फेरी ऑफलाइन पद्धतीने महायोगोत्सव, नागपूर येथे दि. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. या स्पर्धेत जास्तीतजास्त संख्येने स्पर्धकांनी भाग घ्यावे असे आवाहन महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल आणि जिल्हा महासचिव प्रसाद काठे यांनी केले आहे.
*संवाद मिडिया*
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*
*लिंक वर क्लिक करा 👇*
————————————————–
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*
🌐 https://sanwadmedia.com/105547
🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿
👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप
👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇
👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.
🎴 *ओंकार ट्रेडर्स*
*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*
☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१
📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*