*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक अरुण कोर्डे लिखित अप्रतिम लेख*
*कंटाळा*
*******
“कंटाळा”,हा शब्द काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडात खूप असायचा. सुरुवातीला,म्हणजे “कंटाळा” नवीनच वापरु लागलो तेव्हा, लोकांनी वेगवेगळे पर्याय सुचवले.पण मी अतिशय डांबरटपणे म्हणायचो ,” तुमचं म्हणणं, ठीक आहे हो, पण ….”. एखादा उपाय सुचवल्यावर माणूस जेव्हा असं म्हणतो , तेव्हा त्याला कोणताच उपाय अथवा पर्याय नको आहे हे समजावं.ह्या कंटाळ्याने माझी चांगलीच पंचाईत करुन टाकली. मला काही म्हणजे काहीच करायची इच्छा नसायची. परिणामी,मी घरी बसायला लागलो. नंतर नंतर लोक मला टाळू लागले. मी ज्यांच्या ज्यांच्या घरी जायचो,ते काही ना काही कारण काढून संपर्क टाळू लागले. तरीही मला कंटाळ्याचा कंटाळा येईना. अशा रितीने घरी बसायला लागल्यावर मला एक विचार सुचला. हा कंटाळा म्हणजे नक्की काय ? तर कंटाळा,म्हणजे ” काम टाळा” हे दोन्ही शब्द स्वतःशीच भराभर म्हणून पाहा, म्हणजे त्याचा “कंटाळा” होईल.
माझा साऊथ इंडियन मित्र होता तो मला म्हणाला,” तुम कंटाला, कंटाला,बहोत बोलते हो. ऐसा करेगा तो ,उसके बाद “खंडाला” आयेगा. तुम ऐसा करो, जब तुम कंटाला बोलेना चाहते हो तंबी खंडाला खंडाला, बोलो. ” अर्थातच मी तसं केलं नाही,तो भाग वेगळा. मग त्यावर भरपूर विचार केला, तेव्हा लक्षात आलं, आपल्याला कोणतंही काम जमणार नाही,या भीतीपोटी आपण कंटाळा आला, म्हणून म्हणतो. मग मी कंटाळ्याऐवजी थेट भीती वाटते सक्तीने म्हणू लागलो. तेव्हा कसली भीती वाटते हे शोधायला लागल्यावर,वेगवेगळी कारणं सापडू लागली. आणि आस्ते आस्ते कंटाळा,हा शब्द माझ्या तोंडून नाहीसा झाला.
माझे एक मित्र होते,ते असेच सारखं “जाऊ दे ” हे शब्द फार वापरायचे. माझ्या मनात आलं यांना कशापासून तरी पळायचंय किंवा सुटका हवी आहे. मग कळलं की त्यांच्या विरुद्ध क्रिमिनल केस पेंडिंग होती, म्हणून ते असं म्हणत असत. नंतर सुटले आणि भेटले ही नाहीत, त्यामुळे त्यांना विचारता आलं नाही.
मी काही मानसशास्त्रज्ञ नाही. पण मित्रहो, तुमच्या तोंडात असा एखादा शब्द जर असेल,तर त्या मागची भावना शोधा. आणि ती निर्माण झाल्याची पोचपावती मनाला द्या. आणि त्या भावनेचा उल्लेख करा. मग बघा. म्हणजे नको असलेला शब्द आपोआप नाहीसा होईल. मी तर म्हणतो ,असा कोणताही शब्द विनाकारण वापरला जात असेल तर ट्रिक वापरून पाहा. कदाचित उपयोग होईल. मी अशी शब्दांना”इंडिकेटिव्ह वर्ड्स” म्हणतो.
पाहा उपयोग होतोय का.
अरूण कोर्डे
©
——————————————————
*संवाद मिडिया*
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*
*लिंक वर क्लिक करा 👇*
————————————————–
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*
🌐 https://sanwadmedia.com/105547
🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿
👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप
👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇
👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.
🎴 *ओंकार ट्रेडर्स*
*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*
☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१
📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*