You are currently viewing मडुरा रेल्वे स्थानकाला “हॉल्ट स्टेशन”चा दर्जासाठी बेमुदत उपोषण

मडुरा रेल्वे स्थानकाला “हॉल्ट स्टेशन”चा दर्जासाठी बेमुदत उपोषण

एक्सप्रेस गाड्यांसह विशेष गाड्यांना थांबा द्या : माजी सरपंच सुरेश गावडे*

बांदा

कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस त्याचप्रमाणे सणासुदीच्या आणि उन्हाळी सुट्टीच्या कालखंडामध्ये ज्या जादा गाड्या सोडल्या जातात त्यांना मडुरा स्थानकात थांबा मिळावा, तसेच मडुरा स्थानकाचे रुपांतर “हॉल्ट स्टेशन” मध्ये करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी 15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा लेखी इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला आहे.

गेली अनेक वर्षे वारंवार मागणी करून सुद्धा कोकण रेल्वे प्रशासनाने मडुरा स्थानक परीसराकडे दुर्लक्ष केलेले आहे. कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस त्याचप्रमाणे सणासुदीच्या आणि उन्हाळी सुट्टीच्या कालखंडामध्ये ज्या जादा गाड्या सोडल्या जातात त्यांना मडुरा स्थानकात थांबा मिळणेसाठी गेली अनेक वर्ष आम्ही सर्व स्थानिक निवेदनाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटुन कोकण रेल्वे प्रशासनाकडे थांबा देणेसाठी वारंवार मागणी करीत आहोत तरी सुद्धा आजपर्यंत एकाही गाडीला मडुरा स्थानकात थांबा दिलेला नाही.

आमच्या मागणीप्रमाणे मडुरा स्थानक हे क्रासिंग स्टेशन” आहे, त्याचे रुपांतर “हॉल्ट स्टेशन” मध्ये करावे आणि वरील सर्व गाड्यांना मडुरा स्थानकात १४ ऑगस्टपर्यंत थांबा देण्याचे जाहीर करावे अन्यथा आपण परीसरातील सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, राजकीय मंडळी आणि स्थानिक, सर्व सहकारी १५ ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयासमोर सकाळी १०.३० पासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा