बांदा येथील नाबर प्रशालेत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन..!
बांदा :
तालुक्यातील बांदा येथील व्ही.एन.नाबर प्रशालेत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यानिमिताने प्रमुख अतिथि म्हणून लाभलेले बांदा गावचे सुपुत्र, अष्टपैलू खेळाडू, ग्रामपंचायत सदस्य, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख साईनाथ काणेकर हे उपस्थित होते. तालुका क्रीडा समन्वयक नंदकुमार नाईक हेही यावेळी उपस्थित होते.
बुद्धिबळ या खेळाचा जन्म हा भारतातच झालेला आहे. आधी हा खेळ मनोरंजनासाठी खेळला जायचा, परंतु आता हा खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळला जातो. आणि बुद्धिबळ हा खेळ आता संपूर्ण जगभरात खेळला जातो. बुद्धिबळ हा रशिया चा राष्ट्रीय खेळ आहे. बुद्धिबळ हा खेळ दोन खेळाडूंमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये खेळला जातो.बुद्धिबळ हा खेळ खेळायला अचूक रणनीती आणि बुद्धी कौशल्याची आवश्यकता आहे.
बुद्धिबळ हा खेळ शालेय स्तरापासून तर आंतराराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळला जातो.
बुद्धिबळ हा खेळ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खेळतात. बुद्धिबळ या खेळामुळे आपली बौद्धिक पातळी वाढण्यास मदत होते. बुद्धीबळ हा खेळ प्राचीनकाळापाससून खेळला जात आहे. या खेळामुळे एकाग्रता वाढते व
तार्किक दृष्टिकोनही वाढतो आणि आपल्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये स्पष्टता येते.
खिलाडू वृत्ती निर्माण होते. कठीण परिस्थितीमध्ये सर्वोत्तम निर्णय घेण्याचे कौशल्य वाढते.
मेंदूचा व्यायाम होतो आणि आत्मविश्वास निर्माण होतो. तसेच ताण-तणावामध्ये शांत राहण्यास मदत होते.
सदर स्पर्धा 14 वर्षाखालील मुले मुली 17 वर्षाखालील मुले मुली व 19 वर्षाखालील मुले मुली या गटात घेण्यात आली होती.
स्पर्धेसाठी सावंतवाडी तालुक्यातील शाळांनी भाग घेतला होता.विविध शाळातून आलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे क्रीडा शिक्षक व पालकही इथे उपस्थित होते.
यावेळी श्री.कौस्तुभ पेडणेकर , श्री.बी.एस.राणे , व श्री. प्रशांत सावंत यांनी पंचपदी राहून या स्पर्धेची धुरा सांभाळली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व स्पर्धेसाठी आमच्या शाळेची निवड केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री.प्रशांत देसाई यांनी या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेतले यासाठी त्यांचे कौतुकही केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षका सौ. स्नेहा नाईक यांनी केले तर आभार शिक्षिका स्नेहा गावडे यांनी मानले.