You are currently viewing हिवाळे बीएसएनएल टॉवरची समस्या मार्गी लागणार

हिवाळे बीएसएनएल टॉवरची समस्या मार्गी लागणार

माजी खासदार निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा

मालवण

हिवाळे येथील बीएसएनएल टॉवरची खंडित सेवेची समस्या माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे. अशी माहिती जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण सरपंच रघुनाथ धुरी यांनी दिली आहे.

हिवाळे टॉवरच्या माध्यमातून परिसरातील गावांमध्ये बीएसएनएल सेवा दिली जाते. मात्र गेले काही महिने टॉवर मधील तांत्रिक समस्या, नादुरुस्त बॅटरी संच यामुळे बीएसएनएल सेवा सातत्याने खंडित होत होती. लाईट गेली तरीही सेवा ठप्प असे चित्र होते. याप्रश्नी माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण व सरपंच रघुनाथ धुरी यांनी बीएसएनएल अधिकारी तसेच माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. निलेश राणे यांनी बीएसएनएल वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत समस्या सोडवण्याबाबत कार्यवाही व्हावी याबाबत सांगितले. अखेर हिवाळे येथील बीएसएनएल टॉवर समस्या मार्गी लागणार आहे. नादुरुस्त टॉवर साठी बॅटरी संचही नव्याने उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी सरपंच रघुनाथ धुरी, ग्राप सदस्य गणेश धुरी, गणेश एकनाथ धुरी, संजय पवार, सचिन चव्हाण, नंदू पवार यावेळी उपस्थित होते. निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून बीएसएनएल माध्यमातून टॉवर समस्या सोडवताना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर तसेच सावंतवाडी व मालवण विभागाच्या बीएसएनएल अधिकारी यांचे सहकार्य लाभले. तालुक्यातील अन्य बीएसएनएल टॉवर च्या समस्याही निलेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागल्या आहेत. अशी माहिती माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा