वैभववाडी
मुंबई विद्यापीठाचा ५६ वा विभागीय युवा महोत्सव वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरुवार दिनांक १० ऑगस्ट,२०२३ रोजी संपन्न झाला. या सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३८ महाविद्यालयातील जवळपास ११०० विद्यार्थ्यांनी नाट्य, संगीत, कला, ललित कला, लोकनृत्य अशा २८ सांस्कृतिक कला प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवला.
या युवा महोत्सवाचे उद्घाटन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष मा.श्री.सज्जन विनायक रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे यांनी विद्यार्थ्यांना सर्व कलाप्रकारांचे आपल्या भावी आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे हे विशद करताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवून व यशस्वी होऊन मुंबई विद्यापीठामध्ये आपले स्वतःचे, महाविद्यालयाचे व आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन करावे असे आवाहन केले. मुंबई विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमधून दरवर्षी अतिशय उत्कृष्ट कलाकार निर्माण होत असतात व अशा युवा महोत्सवामधूनच घडत असतात असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मुंबई विद्यापीठाने यावर्षीचा युवा महोत्सव घेण्याची संधी दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठ, विद्यार्थी भवनचे संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतीक समन्वयक श्री.निलेश सावे यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. सज्जन विनायक रावराणे यांनी सर्व उपस्थित स्पर्धकांना शुभेच्या दिल्या. उद्घाटनाप्रसंगी शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मा.श्री. धनेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक समन्वयक डॉ.आशिष नाईक, सह समन्वयक डॉ. नितीन वळंजु, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, वैभववाडी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.दिनेश बेटकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रतिनिधी श्री.शिवाजी भवसार, सांस्कृतिक समन्वयक, स्पर्धक व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या युवा महोत्सवामध्ये सर्व स्पर्धकांनी विविध कलाप्रकारांमध्ये आपले चांगले सादरीकरण केले.
सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
भारतीय शास्त्रीय संगीत-प्रथम क्रमांक- स.ह. केळकर कॉलेज, देवगड, द्वितीय क्रमांक – आनंदीबाई रावराणे कॉलेज, वैभववाडी, तालवाद्य- प्रथम क्रमांक- कणकवली कॉलेज, कणकवली, द्वितीय क्रमांक- पुंडलिक अंबाजी कर्ले कॉलेज, शिरगाव, तृतीय क्रमांक- आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज खारेपाटण, उत्तेजनार्थ- स.ह. केळकर कॉलेज, देवगड व विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज,तळेरे, स्वर वाद्य- प्रथम क्रमांक -पंचम खेमराज कॉलेज, सावंतवाडी, द्वितीय क्रमांक-बॅ.खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला, तृतीय क्रमांक- स.ह. केळकर कॉलेज, देवगड, सुगम संगीत- प्रथम क्रमांक- आनंदीबाई रावराणे कॉलेज, वैभववाडी, द्वितीय क्रमांक- एस.एस.पी.एम. कॉलेज, कणकवली, व बॅ.खर्डेकर कॉलेज वेंगुर्ले, तृतीय क्रमांक – कणकवली कॉलेज, कणकवली, उत्तेजनार्थ-आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज खारेपाटण व एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी, भारतीय समूहगीत- प्रथम क्रमांक- स.ह. केळकर कॉलेज देवगड, प्रथम क्रमांक- एस.आर.एम.कॉलेज, कुडाळ, द्वितीय क्रमांक – कणकवली कॉलेज, कणकवली, तृतीय क्रमांक – एल.एस. हळबे कॉलेज, दोडामार्ग, नाट्यसंगीत-प्रथम क्रमांक- आनंदीबाई रावराणे कॉलेज, वैभववाडी, द्वितीय क्रमांक- स.ह. केळकर कॉलेज, देवगड, तृतीय क्रमांक- एस. एस. पी. एम. कॉलेज, कणकवली, उत्तेजनार्थ- एस. आर. एम. कॉलेज कुडाळ, भारतीय शास्त्रीय नृत्य- प्रथम क्रमांक – बॅ.खर्डेकर कॉलेज वेंगुर्ले, द्वितीय क्रमांक- कणकवली कॉलेज, कणकवली, भारतीय लोकनृत्य- प्रथम क्रमांक- एस. पी .के .कॉलेज, सावंतवाडी, द्वितीय क्रमांक – एस. आर. एम. कॉलेज , कुडाळ उत्तेजनार्थ -स.ह.केळकर कॉलेज देवगड व कणकवली कॉलेज, कणकवली, वक्तृत्व स्पर्धा, ग्रुप ए- प्रथम क्रमांक एस .पी. के. कॉलेज सावंतवाडी, द्वितीय क्रमांक- व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज , कुडाळ, उत्तेजनार्थ -एस .आर. एम. कॉलेज, कुडाळ व आनंदीबाई रावराणे कॉलेज वैभववाडी, वक्तृत्व स्पर्धा ग्रुप बी – प्रथम क्रमांक- एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी, द्वितीय क्रमांक – एस .पी .के. लॉ कॉलेज, सावंतवाडी, तृतीय क्रमांक- कणकवली कॉलेज, कणकवली, उत्तेजनार्थ- व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ, व एस. आर. एम .कॉलेज, कुडाळ, वादविवाद मराठी ग्रुप ए- प्रथम क्रमांक -एस.पि.के कॉलेज सावंतवाडी, द्वितीय क्रमांक- व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ, वादविवाद मराठी ग्रुप बी- प्रथम क्रमांक- व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ, कथाकथन ग्रुप ए- प्रथम क्रमांक- व्हिक्टर डाॅंटस लॉ कॉलेज कुडाळ, द्वितीय क्रमांक- स. ह.केळकर कॉलेज देवगड, तृतीय क्रमांक -एस पी. के.कॉलेज सावंतवाडी, उत्तेजनार्थ -कणकवली कॉलेज कणकवली, कथाकथन ग्रुप बी- प्रथम क्रमांक- एस .पी. के. कॉलेज सावंतवाडी, द्वितीय क्रमांक- कणकवली कॉलेज, कणकवली, तृतीय क्रमांक – व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ, उत्तेजनार्थ- एस .के. पी. कॉलेज मालवण, एकांकिका ग्रुप ए- प्रथम क्रमांक- एस .आर .एम .कॉलेज कुडाळ, द्वितीय क्रमांक- व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ, तृतीय क्रमांक- स. ह .केळकर कॉलेज देवगड, उत्तेजनार्थ – एस .के. पी. मालवण कॉलेज व आर्ट्स कॉमर्स कॉलेज, ओरोस, स्किट ग्रुप ए मराठी- प्रथम क्रमांक एस .पी. के. कॉलेज सावंतवाडी, द्वितीय क्रमांक- मेट्रोपोलीटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ओरोस, स्कीट ग्रुप सी- प्रथम क्रमांक- स. ह. केळकर कॉलेज, देवगड द्वितीय क्रमांक – एस .पि .के .कॉलेज सावंतवाडी, अभिनय (सी) या गटामध्ये प्रथम क्रमांक, पुंडलिक अंबाजी कर्ले कॉलेज शिरगाव, द्वितीय क्रमांक श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, तृतीय क्रमांक व्हि. डी. लॉ कॉलेज कुडाळ, मूकअभिनयामध्ये प्रथम क्रमांक स. ह. केळकर कॉलेज देवगड, द्वितीय क्रमांक पुंडलिक अंबाजी कर्ले कॉलेज शिरगाव, नक्कल या कला प्रकारामध्ये प्रथम क्रमांक कणकवली कॉलेज, कणकवली, ऑन द स्पॉट पेंटिंग मध्ये प्रथम क्रमांक बी. एस. बांदेकर फाईन आर्ट्स कॉलेज, सावंतवाडी द्वितीय क्रमांक स.ह. केळकर कॉलेज, देवगड, तृतीय क्रमांक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, फोंडाघाट, कोलाज मध्ये प्रथम क्रमांक कणकवली कॉलेज, कणकवली, द्वितीय क्रमांक बी. एस. बांदेकर फाईन आर्ट्स कॉलेज, सावंतवाडी, तृतीय क्रमांक आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, उत्तेजनार्थ व्हि. डि. लॉ कॉलेज कुडाळ, पोस्टर मेकिंगमध्ये प्रथम क्रमांक बी. एस. बांदेकर कॉलेज, सावंतवाडी, उत्तेजनार्थ आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी, क्ले मॉडलिंग मध्ये प्रथम क्रमांक आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, द्वितीय क्रमांक परमपूज्य विनायक अण्णाभाऊ राऊळ कॉलेज साळगाव, तृतीय क्रमांक बी. एस. बांदेकर कॉलेज, सावंतवाडी, उत्तेजनार्थ स.ह. केळकर महाविद्यालय देवगड, उत्तेजनार्थ संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ, कार्टूनिंग मध्ये प्रथम क्रमांक बी. एस .बांदेकर कॉलेज सावंतवाडी, द्वितीय क्रमांक एस. के. पाटील कॉलेज मालवण, रांगोळी मध्ये प्रथम क्रमांक स. ह. केळकर कॉलेज, देवगड, मेहंदी या कला प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पद्मश्री बाळासाहेब वेंगुर्लेकर कॉलेज पणदूर तिठा, द्वितीय क्रमांक संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ, द्वितीय क्रमांक ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज तळेरे, कणकवली, तृतीय क्रमांक एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कणकवली, तृतीय क्रमांक देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेज, सावंतवाडी, उत्तेजनार्थ एस. के. पाटील कॉलेज मालवण, उत्तेजनार्थ लक्ष्मीबाई हळबे कॉलेज दोडामार्ग यांनी प्राविण्य मिळवले.
या स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या सत्रामध्ये पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या समारंभामध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्राचे वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या विभागीय महोत्सवामध्ये यशस्वी झालेल्या सर्व स्पर्धकांना मुंबई विद्यापीठ येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेमध्ये आता सहभागी होता येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभामध्ये मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे, स्थानिक समिती अध्यक्ष मा.श्री.सज्जनकाका रावराणे, विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मा.श्री.धनेश सावंत, मुंबई विद्यापीठामधून आलेले सर्व कलाप्रकारांमधील दिग्गज परीक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ.आशिष नाईक, सह समन्वयक डॉ. नितीन वळंजु यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या समारंभाला विविध महाविद्यालयामधील सांस्कृतिक समन्वयक, स्पर्धक व विद्यार्थी उपस्थित होते. या युवा महोत्सवाला महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.विनोद तावडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सांस्कृतिक समितीमधील सर्व सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स़जीवनी पाटील व प्रा.निलेश कारेकर यांनी केले. शेवटी डॉ.एम.आय.कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले.