You are currently viewing शामराव पेजे इतर मागासवर्ग महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा लाभ घ्यावा

शामराव पेजे इतर मागासवर्ग महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा लाभ घ्यावा

शामराव पेजे इतर मागासवर्ग महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी

इतर मागासवरर्गीय  आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील  हातकरु, गरजू विद्यार्थ्यांनी  उच्च शिक्षणांसाठी  शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना :- इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिणाकरीता बँकेमार्फत मंजूर केलेल्या रु. 20 लक्ष पर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला  जाईल.

         योजनेचे स्वरुप: राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु 10 लक्ष पर्यंत. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 20 लक्ष पर्यंत.

         लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती-

 अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे, तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा.  अर्जदाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रु.8 लक्ष पर्यंत असावी. अर्जदार हा इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका (Diploma)उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा.

कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे:-

         अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जामीचा दाखला. तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला . तहसिलदार यांचा महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड. ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे. त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो. अर्जदाराचा जन्माचा वयाचा पुरावा. शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र. शिष्यवृत्ती,(Scholarhip) शैक्षणिक शुल्कमाफी, (Freeship) पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र. मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्यास पुरावा. आधार संलग्न बँक खाते पुरावा. तसेच इतर आवश्यक कागदपत्रे पुरावे.

          शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम:- राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम- आरोग्य विज्ञान- MBBS, BDS, BAMS, BHMS, B.Pharm, व संबंधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम. अभियांत्रिकी-B.E, B.Tech, B.Arch (सर्व शाखा) तसेच संबंधीत विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम इ. व्यावसायिक अभ्यासक्रम- LLB, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बचलर ऑफ डिसाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल MBA, MCA SHIPPNG, विषयातील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम इ.  कृषी अन्नप्रकीया व पशुविज्ञान-Animal & Fishery Sciences, B.Tech, BVSC, B.Sc. इ. संबंधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम. देशांतर्गत अभ्यासक्रम- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NACC) अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता आहे. यात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रीया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. परदेशी अभ्यासक्रम– आरोग्य विज्ञान, विज्ञान कला,अभियांत्रिकी,व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी- शिक्षण पुर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केलेल्या  हप्त्यामधील नियमित असलेल्या व्या रकमेचा परतावा (कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल तसेच व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात यईल. ही योजना पुर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी अर्ज महामंडळाच्या  www.msobcfdc.org  या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी  शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, ए विंग, सिंधुदुर्गनगरी , दूरध्वनी क्रमांक 02362 228119, ई-मेल dmobcsindhudhrg@gmail.com व www.msobcfdc.org   या संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा