You are currently viewing क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यासाठी पात्र संस्थानी 7 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यासाठी पात्र संस्थानी 7 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यासाठी पात्र संस्थानी 7 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यासाठी पात्र संस्थेकडून जिल्हा स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र संस्थानी 3 प्रतीत दि. 7 सप्टेंबर 2023 पर्यत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.

          महिला व बाल  विकास विभागांतर्गत अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले, कैद्यांची मुले, काळजी व संरक्षंणाची गरज असलेल्या 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुला मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावराणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्याचे संगोपन व विकास घडवून आणणे या उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना 30/5/2023 च्या शासन निर्णयानुसार कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

          या शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने बालसंगोपन योजना जिल्हास्तरावर राबविण्याकरीता विहित पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची निव करण्याकरिता शासन निर्णयातील परिशिष्ट ब, क, ड, फ, व इ नुसार संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत  आहेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov,in आणि आयुक्तालयाच्या www.wcdcommpune.com  या अधिकृत संकेतस्थाळाला भेट द्यावी.

तरी पात्र संस्थानी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग प्रशासकीय इमारत ए-विंग, तळमजला, दालन क्र. 106 सिंधुदुर्गनगरी या कार्यालयाकडे जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून  एका महिन्याच्या आत म्हणजेच दि. 7 /9/2023 पर्यंत अर्ज सादर  करावयाचे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा