You are currently viewing पाउस तुझा माझा…!!

पाउस तुझा माझा…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री मानसी म्हसकर लिखित अप्रतिम काव्यचक*

 

*पाउस तुझा माझा…!!*

 

पाउस तुझा माझा…..

 

कधी कुणालाच न कळलेला

चिखलात पडता सहज मळलेला

 

पाउस तुझा माझा…

 

कांद्यां सोबत बेसनात लोळलेला

वाफाळलेल्या चहाच्या घोटाने पोळलेला

 

पाउस तुझा माझा…

 

ढगांच्या कडकडाटांत हसलेला

सौदामिनीच्या प्रकाशझोतात फसलेला

 

पाउस तुझा माझा…

 

वाहत्या वाऱ्या संग नाचलेला

डबक्यां मध्ये तुडुंब साचलेला

 

पाउस तुझा माझा…

 

बेडकांच्या आवाजात दडलेला

कागदाच्या होडीत डोक्यावर पडलेला

 

पाउस तुझा माझा…

 

चिऊ काऊंच्या घरट्यात लपलेला

खिशात खोटा पैसा अजूनही जपलेला

 

पाउस तुझा माझा…

 

जोडीदाराच्या बाहुपाशात हरवलेला

कथा गीतांच्या शब्दांत सतत गिरवलेला

 

पाउस तुझा माझा…

 

एकांती ढगाआड जाऊन रूसलेला

माणूसवेडा होउन उन्मुक्त बरसलेला

 

पाउस तुझा माझा…

 

आठवणींना कवेत घेऊन रडलेला

बेधुंद श्रावणाच्या सरीत मोतीसम जडलेला

 

पाउस तुझा माझा…

 

हात जोडून केलेल्या विनवणीत अडकलेला

कोरड्या डोळ्यांत येऊन अवेळी धडकलेला

 

पाउस तुझा माझा…

 

चातुर्मासाच्या उपवासात शिजलेला

कोसळणाऱ्या धारांसोबत

नखशिखांत भिजलेला…

 

पाउस तुझा माझा…..

 

… सौ मानसी म्हसकर वडोदरा गुजरात

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

https://youtu.be/8u_P6neABTc

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप 

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल. 

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

 *वेबसाईट :* 

www.sanwadmedia.com

——————————————————-

 *फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

 *इन्स्टाग्राम पेज :* 

https://www.instagram.com/sanvadmedia

—————————————————— 

 *ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

 *चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा