You are currently viewing आंबोलीत 12 ते 16 ऑगस्ट वर्षा महोत्सवाचे आयोजन

आंबोलीत 12 ते 16 ऑगस्ट वर्षा महोत्सवाचे आयोजन

आंबोलीत 12 ते 16 ऑगस्ट वर्षा महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने दि. 12 ऑगस्ट  ते 16 ऑगस्ट या कालावधीत “आंबोली वर्षा महोत्सव 2023” चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आंबोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती हनुमंत हेडे, उपसंचालक पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांनी दिली.

            जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धी व प्रचालनासाठी तसेच पर्यटकांच्या वाढीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या स्थळांची पर्यटकांना ओळख व्हावी, या दृष्टीने “आंबोली वर्षा महोत्सव 2023”      चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षा महोत्सवामध्ये कोकणातील सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेता विविध सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दशावतार, फुगडी, चांगभल असे विविध प्रकार इथे पहावयास मिळतील. शहीद हवालदार पांडुरंग गावडे स्मारक येथे माजी सैनिकांचे संचलन  तसेच इतर साहसी पर्यटन ऍक्टिव्हिटी चे आयोजन करण्यात आलेले आहे.

            जिल्ह्यातील आंबोली हे पर्यटन स्थळ पर्यटनाच्या वेगवेगळ्या आकर्षाणानी समृद्ध असल्याने आंबोलीतील पावसाळी पर्यटन  येथील जैवविविधता आणि सहसी पर्यटनाचे अनुभव देण्यासाठी  इतर 9 राज्यातील टूर ऑपरेटर यांचे करिता ” FAM TOUR ” आयोजित केली आहे. या FAM TOUR मध्ये आंद्रप्रदेश, दिल्ली, गुजरात, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिमबंगाल, व गोवा अश्या एकूण 50 टूर ऑपरेटर यांनी सहभाग घेतला आहे. हि FAM TOUR अंबोली परिसर, सावंतवाडी, धामापूर आणि भोगवे समुद्रकिनारा या पर्यटन स्थळांना भेट देतील.

            कोकण म्हटल की नजरेसमोर काय येत ? समुद्रकिनारे, समृद्ध निसर्ग, खळाळते झरे, डोंगरदऱ्या नारळ पोफळीच्या बागा, नारळ, काजू, फणस, भातशेती: चौमोळी छपराची घरे, वाडी, पानात उकडीचे मोदक, अंबापोळी, सुरमई पापलेट, कोंबडीवडा, कोकम सरबत आणि या सर्वांचा आस्वाद घ्यायला येणारा पर्यटक असे सगळे डोळ्यासमोर उभे राहते. कोकणात पर्यटन उद्योग हा आघाडीचा उद्योग आहे. कोकणातील शेतकरी, महिला बचत गट, तरुण-तरुणी, होम स्टे, हॉटेल रिसॉर्ट; तसेच इतर राहण्या – खाण्याची व फिरण्याच्या सुविधांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा