रत्नागिरी
रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी व कर्ला मच्छिमार सह. संस्था कर्ला रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मच्छिमार दिवस साजरा करण्यात आला.
21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मच्छिमार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून मासेमारांसाठी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाची माहिती देण्यात आली. मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी यांच्या वतीने सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी डॉ रश्मी अंबुलकर यांनी मासेमारांना विविध मत्स्य संपदा योजनेचि माहिती दिली. कर्ला मच्छिमार सह. संस्थेचे अध्यक्ष नदीम सोलकर यांनी मत्स्य विभागाच्या योजनाचे स्वागत केले व या योजना मासेमारांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी मत्स्य संपदा योजनाचि माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याची विनंती मत्स्य विभागाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने केली.
तसेच रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या मासेमारासाठी असलेल्या विविध सेवाचि माहिती दिली व प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना प्रत्येक मासेमारा पर्यंत ध्वनी संदेश व व्हाट्सअप च्या माध्यमातून पोहचवण्याचं प्रयत्न करणार असल्याच नमूद केले. मासेमारांचं कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे नियोजन कर्ला मच्छिमार संस्था व रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक चिन्मय साळवी यांनी केले.