*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित – पंडित लिखित अप्रतिम लेख*
*सुसंवाद -२*
या आधीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे पाच नियम तुम्हाला सांगायचे म्हणून लिहू लागले तर बघता बघता पानभर यादी तयार झाली. आता मला यातले कुठले ठळक पाच नियम बाजूला काढून सांगावे हा मोठा प्रश्न पडला. याचा अर्थ जर का प्रत्येकानेच विचार केला तर आपल्याला खरोखर कितीतरी मार्गाने प्रश्नांची उत्तरे शोधता येतात. तर चला पाहूया आपण काय काय करू शकतो ते.
माणसाचं मन कसं आहे ना की हे अपथ्य आहे हे खाऊ नको, इकडे जाऊ नको, असं करू नको असं सांगितलं की त्याचवेळी नेमकं ते अपथ्याचं खायची तीव्र इच्छा निर्माण होते. नेमकं जिकडे जाऊ नको सांगितले त्याच दिशेला जायची आणि जे करू नको सांगितले तेच करून पाहायची इच्छा प्रबळ होते.
तेव्हा आता मी तुम्हाला मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर वापरू नका बघू नका असं काहीच सांगणार नाही. याऐवजी आपण ही उपकरणं सोडून काय काय करू शकतो याचा विचार करूया.
आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं वेळापत्रक काय काय आहे ते पाहून निदान एक वेळ तरी जेवण सगळ्यांनी एकत्र करायचं आपण ठरवूया. जेवताना मोबाईल, टीव्ही, पेपर, पुस्तक असं काहीही हाताळायचं किंवा नुसतं चाळायचं सुद्धा नाही हा नियम अमलात आणूया. दिवसभरातल्या हलक्या फुलक्या घडामोडी आणि सकारात्मक आनंददायी चर्चा होईल या दृष्टीने गप्पा मारणे अपेक्षित आहे.
घरात जर का चार-पाच माणसं असतील तर दोघा दोघांच्या वेळेनुसार ग्रुप करायचे आणि सकाळी किंवा संध्याकाळी जमेल त्यावेळी एखादा खेळ जसे की बॅडमिंटन, फ्रीस्बी, रिंग, टेनिस, क्रिकेट, लगोरी किंवा आवडीचा कुठलाही खेळ रोज किमान अर्धा ते पाऊण तास तरी खेळायचा आहे. सगळ्यांनी मिळून खेळता आलं तर उत्तमच आहे.
प्रत्येक चांगलं पुस्तक विकत घेणं शक्य नसतं. पण वाचनालयातून अनेक चांगली पुस्तकं आणून वाचणं सहज शक्य आहे. म्हणून जवळच्या एखाद्या वाचनालयाचं सदस्यत्व घरातल्या प्रत्येकाचं असणं महत्त्वाचं आहे, लहान मुलांचं सुद्धा. आपण वाचलेल्या पुस्तकांवर, त्यातल्या चांगल्या गोष्टींवर चर्चा करता आली तर वाचलेले पुस्तक विसरणार तर नाहीच आणि दुसऱ्यालाही त्या पुस्तकाबद्दल माहिती मिळेल.
घरातल्या कामांची यादी खूप मोठी असते. ती कामं वेळोवेळी गृहिणी करतच असल्यामुळे शक्यतो बाहेर कुणाला दिसून येत नाहीत. या घरकामांची, पुढच्या आठवड्यासाठी कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीची यादी केली तर सोपं पडतं. आणि शक्य असेल तसं दिवसभरात एक तरी काम आपण स्वतःहून करण्याचा उत्साह दाखवावा आणि ते जबाबदारीने पार पाडावे जेणेकरून घरातील महिलेवरचा भार थोडा हलका होईल आणि त्या कामालाही प्रतिष्ठा प्राप्त होईल. घरासाठी लागणाऱ्या नवीन वस्तू किंवा फर्निचर अशा गोष्टींवर सर्वांमध्ये चर्चा करूनच निर्णय घ्यावा.
त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमधे आपल्या मताचा आदर केला जातो ही एक सुखावणारी भावना तयार होते. त्यामुळे घराबद्दल जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टींचा विचार केला जातो. त्याचप्रमाणे कुणी जर का एखाद्या बाबतीत प्राविन्य मिळवलं असेल किंवा छान काम केलं असेल तर त्याला त्याचं श्रेय देताना कंजूषी करू नये किंवा ते श्रेय लाटू नये.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंधश्रद्धा नसावी पण श्रद्धा मात्र निश्चितच असावी. ईश्वरी इच्छेविरुद्ध झाडाचं पानही हालत नाही असं म्हणतात. हे खरं मानलं तर श्रद्धेचं महत्व निश्चित पणे लक्षात येईल. ज्या धर्माचं आपण अनुसरून करत आहोत त्यातल्या श्रद्धेय शक्तीवर निश्चितच आपली श्रद्धा असावी जेणेकरून काही प्रमाणात का होईना आपल्या हातात नसलेल्या गोष्टींचा थोडाफार तरी भार हलका होऊ शकेल.अन्यथा या जगातल्या चिंता,कटकटींचा ताण असह्य होऊन आपले अमूल्य असे जीवन संपवल्याच्या घटना टाळल्या जातील का? थोडावेळ प्रार्थनेसाठी अवश्य राखून ठेवावा.
तर आपण इथे थोडक्यात काही नियम बघितले की जेणेकरून स्वतःला आणि कुटुंबाला चांगल्या प्रतीचा वेळ दिल्यामुळे मोबाईल टीव्ही कम्प्युटर इंटरनेट अशा गोष्टींपासून रोजचा थोडा वेळ तरी आपण दूर राहू शकू. आपल्या कुटुंबाचं, मित्र परिवाराचं सानिध्य लाभल्यामुळे तसेच मानसिक आणि भावनिक पाठिंबा मिळाल्यामुळे खूपसे अनिष्ट प्रसंग टाळता येतील.
त्यासोबतच तुमचे स्वतःचे काही मूद्दे वाढवून तुम्ही एक यादी तयार करू शकता पण त्याप्रमाणे वागणंही तितकच महत्त्वाचं आहे,रोज!
मग सांगा पाहू, तुम्ही आजपासून काय काय बदल करणार रोजच्या वागण्यात ते?
©®अंजली दीक्षित-पंडित
*संवाद मिडिया*
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*
*Advt Link👇*
————————————————–
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..
🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿
👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप
👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇
👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.
🎴 *ओंकार ट्रेडर्स*
*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*
☎️ *संपर्क : ७७७४९००५०१*
📱 *मो.९४२३३०४७९६,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*