भाजपने बिहारच्या निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यावेळी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण सिंह यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकी तयारीला आम्ही सुरुवात केली असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा भाजप संघटनेला मजबूत करण्यासाठी देशात 120 दिवसाचा दौरा करणार असून प्रत्येक बूथ आणि मंडळ कार्यकर्त्याला यादरम्यान ते संबोधित करतील, अशी माहिती ही सिंह यांनी दिली आहे.
या दौऱ्यात भाजपच्या योजना कुठं पर्यंत पोहचल्या याचा आढावा पक्षाध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा घेणार आहेत. तसंच जिथं भाजप योजना पोहचल्या नाही तिथं पोहचवण्यासाठी हा प्रवास असल्याचं देखील अरुण सिंह म्हणाले. या दौऱ्यात बुद्धिजीवी, विशेष वर्गाच्या लोकांशी जे. पी नड्डा स्वतः संवाद साधणार आहेत. दौऱ्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी जे.पी. नड्डा पत्रकार परिषद घेऊन त्यावेळच्या परिस्थितीतील कामाची विभागणी करतील, असंही अरुण सिंह यांनी सांगितलं.
‘ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे त्या त्या संबंधित ठिकाणी आपल्या कामाचा प्रेझेन्टेन्शन स्वत: पक्षाध्यक्ष देतील,’ असंही अरुण सिंह यांनी सांगितलं आहे. 5 डिसेंबरपासून उत्तराखंडमधून हा दौरा सुरू करण्यात होईल, जो पुढे 120 आखण्यात येईल. A B C प्रमाणे देश दौऱ्याचे नियोजन केले आहे. जे राज्य मोठे आहे तिथे जे. पी. नड्डा 3 दिवस थांबतील. इतर ठिकाणी 2 दिवस थांबतील, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
बिहार निवडणुकीच्या यशानंतर भाजपाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. येत्या वर्षभरात देशातील 5 विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची पूर्व तयारी व आखणी दिसून येत आहे.