You are currently viewing भावगीता

भावगीता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे श्री.वि. ग .सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भावगीता*

***********

आत्मानंदी आनंद विलासी

तुम्हा संगती रमला आहे

गतजन्मांच्या ऋणानुबंधी

भवताली श्वास गुंतला आहे….

 

फुलांफुलांचे रंग लाघवी

दरवळणारा माहोल आहे

मधाळलेल्या मकरंदातुनी

सुखात्मा हा गुंतला आहे….

 

क्षण येती सांडूनी जाती

हीच नियतीची रिती आहे

जगण्यासाठी जन्म आपुला

हसत हसतची जगणे आहे….

 

क्षितिजावरची सांज लोभस

भावगीता आळवीत आहे

आत्मरंगली अवीट सुरावट

परमसुखाचे वरदान आहे….

 

**********************

*रचना क्र.१०० / ९ – ८ – २०२३*

*©️ वि.ग.सातपुते. ( भावकवी )*

*📞(9766544908 )* (बेंगलोर )

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =