You are currently viewing आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कटिबंध: तहसीलदार रमेश पवार

आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कटिबंध: तहसीलदार रमेश पवार

अखंड लोकमंच सिंधुदुर्ग च्या वतीने कणकवलीत आदिवासी दिन साजरा

तहसीलदार रमेश पवार यांचा आदिवशी कातकरी बांधवांनी केला सत्कार; दाखल्यांचे केले वितरण

कणकवली

आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शहरातच त्यांच्या हक्काची घरे देण्यासाठी आपण कटिबंध आहोत. तसेच पुढील जागतिक आदिवासी दिनापूर्वी आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहन देवगड तहसीलदार रमेश पवार यांनी दिली. यावेळी वेगवेगळ्या आदिवासी दाखण्यांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
अखंड लोकमंच सिंधुदुर्ग च्या श्रमिक मुक्तीवेध विभाग तर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त उलगुलान मेळा येथील नगर वाचनालय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ता हनिफ पिरखान, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, अखंड लोक मंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, शैलजा कदम, आदिवासी प्रतिनिधी शिल्पा पवार यांच्यासह कातकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी हुतात्मे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, संविधान वाचून करण्यात आली. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले, ज्याप्रकारे आर. जे.पवार यांनी आदिवासी समाज बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे त्यांचे कार्य पुढे नेऊन त्यांना जी काही मदत लागेल ती मदत प्रशासनामार्फत केली जाईल, असे सांगितले. प्रस्तावनात नामानंद मोडक यांनी अखंड लोकमंचामार्फत कणकवली तालुक्यातील आणि इतर भागातील कातकरी बांधवांना व्यसनमुक्त करण्याचे काम संस्थेने केले. चांगले व्यवसाय रोजगार करण्यासाठी प्रवृत्त केले.असे सांगितले.यावेळी कातकरी बांधवांतर्फे आदर्श तहसीलदार रमेश पवार यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कातकरी बांधवांना मान्यवरांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. तर आभार संतोष राऊळ यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा