आ. नितेश राणे यांच्या देवगड तहसील कार्यालयाला सूचना!
देवगड
कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी स्थानिक विकास निधीतून देवगड तहसीलदार कार्यालयासाठी ५ संगणक संच,२ प्रिंटर बुधवारी देवगड तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार आर जे पवार यांच्याकडे सुपूर्त केले,
देवगड तहसीलदारपदी नियुक्ती होऊन आलेले तहसीलदार आर जे पवार यांनी देवगड तहसीलदार कार्यालयात कार्यालयीन कामाचा आढावा घेतला . त्यावेळी कर्मचाऱ्यांनी संगणकांची संख्या कमी असल्याने कार्यालयीन कामकाज करण्यासाठी विलंब होतो.ही बाब निदर्शनास आणून दिली.
तहसीलदार आर जे पवार यांनी तात्काळ आमदार नितेश राणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून संगणक व प्रिंटरची मागणी केली होती, आमदार नितेश राणे यांनी अवघ्या पाच दिवसात देवगड तहसीलदार कार्यालयाची मागणी पूर्ण करून बुधवारी तहसीलदार आर जे पवार यांच्याजवळ ५ संगणक संच व २ प्रिंटर सुपूर्त केले, तालुक्यातील कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या जनतेची कामे जलद गतीने होतील .यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करा अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी तहसीलदार व तहसील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना केली.यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे,तहसीलदार रमेश पवार, व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते