You are currently viewing भाजपच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व मुख्याध्यापक सन्मान सोहळा

भाजपच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व मुख्याध्यापक सन्मान सोहळा

*भाजपच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व मुख्याध्यापक सन्मान सोहळा*

*कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती*

*डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर व डॉ. अमेय देसाई यांचा कोकण रत्न पुरस्काराने सन्मा.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते केला जाणार सन्मान*

महाराष्ट्रात आणि कोकणात शालांत परीक्षा व बारावी परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सातत्याने अव्वल राहिलेला आहे. ही शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि वेंगुर्ला तालुक्यातील ज्या प्रशालांचा शालांत परीक्षेमध्ये १००% निकाल लागलेला आहे अशा सर्व प्रशालांच्या मुख्याध्यापकांचा विशेष सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वा. स्वामिनी मंडपम ( पाटकर हायस्कूल नजीक ) येथे संपन्न होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यात गेली कित्येक वर्ष स्त्री रोगतज्ञ म्हणून अविरत सेवा देणारे, गरीबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला अत्यावश्यक सेवा सुविधा प्रदान करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे, त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातील रुग्णांचे मुंबई येथे नेऊन शस्त्रक्रिया सेवा देणारे तसेच इतर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे डॉ.अमेय देसाई या दोन्ही डॉक्टरांचा आरोग्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ‘ *कोकण रत्न पुरस्कार* ‘ देऊन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाणार आहे.
तसेच या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , माजी जिल्हाध्यक्ष व मा.आमदार राजन तेली , कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल , प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
तरी वेंगुर्ला तालुक्यातील शालांत परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी व १००% निकाल देणाऱ्या प्रशालेतील मुख्याध्यापकांनी व शिक्षण प्रेमी नागरीकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा