You are currently viewing समुद्रातील कृत्रिम रीफ (भित्तीका) विषयी १० व ११ रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

समुद्रातील कृत्रिम रीफ (भित्तीका) विषयी १० व ११ रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

मालवण

केंद्र शासनाने कृत्रिम रिफ व सागरी संचयनाद्वारे किनारी मत्स्यव्यवसाय पुन्हा निर्माण करण्याकरीता प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत (PMMSY) “कृत्रिम रिफ व सागरी संचयनामार्फत शाश्वत मत्स्यव्यवसाय व उपजीविकेस प्रोत्साहन या नवीन घटकाचा समावेश केला आहे. या योजनेअंतर्गत कृत्रिम रिफ म्हणजेच कृत्रिम भित्तीका विषयी माहिती, त्याचे महत्व तसेच संगोपन विषयी किनारपट्टीवरील गावातील मच्छिमार बांधवांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आला आहे. त्यानुसार दि. १० व ११ ऑगस्ट रोजी देवगड, मालवण व वेंगुर्ला येथे कृत्रिम रिफ (भित्तीका) जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय समुद्री मात्स्यिकी अनुसंधान संस्थानच्या चेन्नई विभागाचे वैज्ञानिक डॉ. जो किझाकुडन हे सिंधुदुर्गात येऊन या जनजागृती कार्यक्रमात या ठिकाणच्या समुद्रात कृत्रिम रीफ स्थापनेबाबतची तांत्रिक माहिती, रीफचे महत्त्व व रीफ संदर्भाची कृती कशी अंमलात आणण्यात येईल, याबाबत जनजागृती व मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता देवगड येथे देवदुर्ग मत्स्य सहकारी संस्था, दुपारी ४:३० वाजता मालवण दांडी येथे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र व दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ला येथे वेंगुर्ला मत्स्य सहकारी संस्था याठिकाणी हा जनजागृती कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमांस जाणकार मच्छिमार, नौकामालक, खलाशी, तांडेल, संस्था सभासद यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. अलगिरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा