*पत्रकार, स्तंभलेखक, कवी ॲड.रूपेश पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निखळ*
तुझ्या माझ्या मैत्रीत, अस काय होत
की मन अगदी जडून गेल
कळत नकळत हे सार घडल
हे नात कस बर निर्मिल
मला समजलच नाही।१
एरव्ही वाऱ्यासारखा वाहणारा मी
मैत्रीच्या कक्षेत क्वचितच रुळणारा मी
तुझ्या या मैत्रीत, कसा मी वसलो
आणि मग मी गुरफटलो
मला समजलच नाही।२
मी मागे वळून पाहिल
पण स्मृतीत अस्पष्ट झाल
काहीस दिसत होत
गप्पांमध्ये मित्र मैत्रीणीच नात रुजल
मला समजलच नाही।३
मैत्रीतल्या माझ्या ताऱ्यांमध्ये
तुझही नातं लूकलूकत होत
मेघ नसलेल्या निळाई सारख
ते निखळ असच होत
मला समजलच नाही।४
ते निराळ्या मैत्रीच होत
त्याहून ही श्रेष्ठ होत
कधी बहीण भावाच होत
हे नात, जन्मांतरीच वाटल
देवाच अस्तित्व मला समजल।५
तुझ्या माझ्या मैत्रीत, अस काय होतं
रुपेश पवार
9930852165