You are currently viewing सिंधुदुर्गातील अवैध धंदे तत्काळ बंद करा!

सिंधुदुर्गातील अवैध धंदे तत्काळ बंद करा!

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्यासह शिष्टमंडळाची एसपींकडे मागणी

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत. त्यामध्ये दारू, गुटखा, जुगार, जनावर तस्करी, वेश्या व्यवसाय या धंद्यानी धुमाकूळ घातला आहे. यामधून दिवसाकाठी अनेक गुन्हे, चोऱ्या, वाद विवाद असे प्रकार घडत आहेत. यामुळे शहरासह परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र या सर्व प्रकाराकडे पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची निवेदने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांकडून येत आहेत.
या अवैध धंद्यामुळे यातून आजची तरुणवर्ग व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे अनेक संसार देशोधडीला लागले आहेत. तसेच अनेक भांडणे होऊन त्याचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात झाल्याचा इतिहास ताजा आहे. तरी कृपया आपणास विनंती आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे तात्काळ पूर्णतः बंद करून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करावी, नाही तर आम्हाला आमच्या मार्गाने दाद मागावी लागेल. असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, माजी जि. प. सभापती संदेश पटेल आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा