You are currently viewing भालचंद्र मित्रमंडळ कणकवली आयोजित भालचंद्र चषक २०२३ जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा

भालचंद्र मित्रमंडळ कणकवली आयोजित भालचंद्र चषक २०२३ जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा

कब्बडी स्पर्धेचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते उद्घाटन*

*जिल्ह्यतील कबड्डीपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसावेत- समीर नलावडे*

कणकवली

भालचंद्र मित्रमंडळ कणकवली भालचंद्र चषक २०२३ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा न. पं. च्या नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इनडोअर कबड्डी खेळण्यासाठी मॅटचा वापर केला जातो. त्यासाठी इनडोअर स्टेडियम व्हावे हे स्वप्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या माध्यमातून परमहंस भालचंद्र महाराजांच्या भूमीत स्वप्न सत्यात उतरल्याचे समाधान मिळाले असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे केले. त्याप्रमाणेच खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रासोबतच उद्योग क्षेत्रातही नाव कमवून आत्मनिर्भर व्हावे असेही सांगितले. या मंडळाने इनडोअर कबड्डी स्पर्धा भरवले आहेत तर असेच उपक्रम कणकवली शहरामध्ये राबवावे व खेळाडूंनी कणकवली मर्यादित न राहता मार्गदर्शन मिळवून प्रणय राणे सारखे खेळाडू घडले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तुमच्या मधील अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली पाहिजेत. याआधी ५० कोटी आणि आता ३ कोटी १२ लाख निधी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहरासाठी मिळाला आहे. खेळाडूंसाठी इनडोअर गेमचे उत्कृष्ट दालन उभारले आहे. या माध्यमातून शहरात इनडोअर गेमचे उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. या परिसरात स्विमिंग पूलसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे श्री. नलावडे यांनी सांगितले.

कणकवली न. पं. च्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित भालचंद्र चषक २०२३ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते. उद्घाटन समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशांत सावंत, वैभव काणेकर, मंडळाचे अध्यक्ष अक्षय चव्हाण, सुशांत सावंत, जोगी राणे, शिवलिंग पाटील, स्पर्धा निरीक्षक तुषार साळगावकर, पंचप्रमुख सुदिन पेडणेकर, पंच जयेश परब, मधुकर पाटील, सुरज परब, गौरव राणे, चिन्मय माणगावकर, रोहित मसुरकर, भावेश मयेकर, ओंकार खांडेकर, सुमित गावडे, प्रतीक कडुलकर, राहुल राठोड, ऋतिक चौगुले, योगेश कुलकर्णी, राज साळुंखे, मयुरेश पांचाळ, यश पाटील, रुद्रेश लाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने क्रीडा रसिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा